कोपरगाव : आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव घेऊन संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी मनसे कोपरगाव शाखेच्या वतीने तालुक्यातील तरुण तरुणींना, महिलांना पक्ष भुमिका समजून घेण्यासाठी शहर व तालुक्यात सदस्य नोंदणी अभियानास शुभारंभ करण्यात आला
प्रतिमा पूजन करताना अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष राजेश लुटे, शहराध्यक्ष सतिश आण्णा काकडे, तालुकाध्यक्ष नवनाथ मोहिते, उपनगराध्यक्ष अनिल गाडे, प्रमोद आखे, बंटी सपकाळ, हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू भाऊ काकडे किरण मोहिते आदी उपस्थित होते
मनसेच्या संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी व राज ठाकरे यांच्या विचारांचा प्रचार करुन पक्ष भुमिका समाजात नेण्यासाठी सदरचे अभियान सुरू करण्यात आले असून तरुणांना समवेत महिलांनी प्रगतीसाठी प्रतिसाद दिला. सभासद नोंदणी अभियान यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी शहराध्यक्ष अतिश शिंदे, उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर, प्रतिक त्रिभुवन, वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष साई सुपेकर, कामगार उप जिल्हाध्यक्ष बंटी भैय्या सपकळ, कामगार शहराध्यक्ष बलली पाटोळे, कामगार तालुकाध्यक्ष संजय जाधव, वाहतूक ऊप शहराध्यक्ष शाम यादव, कामगार उप शहराध्यक्ष अमजद सैय्यद, छोटुभाई पठाण, संतोष मोहिते, साई सुपेकर, सुरेश सुपेकर, विक्रम काकडे यांनी परिश्रम घेतले सभासद होण्यासाठी संपर्क साधण्यासाठी मनसे वाचनालय, म गांधीजी चौक येथे संपर्क साधावा असे आवाहन केले
नवीन सभासद नोंदणी अभियानास प्रतिसाद मिळाल्याने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आणि उत्साह वाढला असे विचार व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यात मनसेचे सभासद नोंदणी अभियानास प्रारंभ











