शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे तातडीचे निर्देश!

---Advertisement---

आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या मागणीची दखल; वन अधिकाऱ्यांना थेट फोन, अतिरिक्त पथके व पिंजरे
तैनात करण्याच्या सूचना

नेवासा : नेवासा तालुक्यातील गोधेगाव परिसरात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी वनमंत्री ना. गणेश नाईक यांची मुंबई मंत्रालय येथे प्रत्यक्ष भेट घेऊन परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले. याची तातडीने दखल घेत वनमंत्र्यांनी अहिल्यानगर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी (आरएफओ) यांना थेट दूरध्वनी करून परिस्थितीचा आढावा घेतला व बिबट्याच्या बंदोबस्तासाठी ठोस कार्यवाहीचे निर्देश दिले.

गोधेगाव येथे १५ ऑक्टोबर रोजी शेतमजूर सुरेश अहिरे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यानंतरही परिसरात आणखी दोन ते तीन नागरिकांवर बिबट्याने हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, आज मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सकाळीही परिसरात बिबट्याने आणखी एका व्यक्तीवर हल्ला करून चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असल्याने शेतकरी, शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच तीव्र झाले आहे.

सदर परिसरातील नागरिकांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने शेती व शेतमजुरीवर अवलंबून आहे. मात्र, बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत असून, शेतीकामे व दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः महिला, लहान मुले व शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार लंघे यांनी वनमंत्री नाईक यांच्यासमोर सर्व परिस्थिती मांडून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. याची त्वरित दखल घेत वनमंत्र्यांनी अतिरिक्त वन कर्मचारी व विशेष पथके तैनात करणे, आवश्यक ठिकाणी पिंजरे लावणे आणि बिबट्याची शोधमोहीम तीव्र करण्याचे निर्देश दिले.
नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्यास कायदेशीर तरतुदी व आवश्यक परवानग्यांनुसार बिबट्याला शूट करण्याच्या पर्यायाबाबतही निर्णय घेण्याच्या सूचना दिल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
तसेच मृत शेतमजुराच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत कशा प्रकारे उपलब्ध करून देता येईल, याबाबत वनमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. आवश्यक कागदपत्रे व वस्तुस्थितीची पडताळणी करून शासन नियमानुसार आर्थिक मदतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नागरिकांच्या जीविताचे संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असून, संबंधित बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत वन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी स्पष्ट केले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

महाराष्ट्र-मलेशिया दरम्यान व्यापक परस्पर सहकार्य – मंत्री रावल

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांची जागतिक स्तरावरील संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या जागतिक क्रमवारीत डॉ. ए. एस. सय्यद यांचा ८१ वा क्रमांक

महात्मा फुले कृषि विद्यापीठात भरडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

होम मिनिस्टर कार्यक्रमात पाणी वाचवावर महिलांमध्ये जनजागृती

बेलापूर भाजप व वीर सावकर मित्र मंडळाकडून विविध शाळामध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम

बालाजी देवस्थान ट्रस्टच्या दानपेट्यांतील रकमेची मोजदाद; निरीक्षणाखाली प्रक्रिया पूर्ण

Leave a Comment