शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

---Advertisement---

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करत आहेत. देशाच्या विकासाबाबत चुकीचे चित्र उभे करून जनतेची दिशाभूल करण्याचा विरोधकांचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. विरोधकांच्या या राजकारणाला आता रस्त्यावर उतरून उत्तर देण्याची वेळ आली असून, भाजपच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ आंदोलन उभारण्यात येणार असल्याची आक्रमक भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली.हेरिटेज येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा, पक्षाची भूमिका आणि केंद्र सरकारच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबाबत चर्चा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा उंचावली असून, विविध क्षेत्रांत भारत प्रगती करत आहे. मात्र, विरोधकांकडून जाणीवपूर्वक चुकीचे कथानक मांडून देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गोरे यांनी केला.
विरोधकांच्या आरोपांना केवळ राजकीय वक्तव्यांतून उत्तर न देता, भाजप कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाऊन वस्तुस्थिती मांडावी. मोदी सरकारने केलेली विकासकामे, विविध योजनांचे लाभ आणि देशाच्या प्रगतीचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहनही या बैठकीत करण्यात आले. ‘लोकतंत्र बचाव, भिडतंत्र हटाव’ या घोषणेच्या माध्यमातून विरोधकांच्या राजकारणाला प्रत्युत्तर देत जनतेमध्ये व्यापक जनजागृती करण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.आगामी काळात या आंदोलनाच्या माध्यमातून राहुल गांधी आणि विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत भाजप आपली राजकीय भूमिका अधिक आक्रमकपणे मांडणार आहे. पक्ष संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना सक्रिय करून सरकारची विकासकामे घराघरांत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात भाजपच्या या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे.
या बैठकीला आमदार राजा राऊत, माजी आमदार दीपक साळुंके, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार नरसिंग मेंगजी, राम सातपुते, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, गणेश चिवटे, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, शहाजी पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, बाळराजे पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment