बेलापूर : भाजप शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व वीर सावरकर मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद उर्दू शाळेसह बेलापूर येथीलअन्य शाळामधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन आदी शालेय साहित्यासह खाऊचे वाटप करण्यात आले.
श्री. डावरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.यावेळी अभिषेक खंडागळे, रणजित श्रीगोंदे, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष मोहसीन सय्यद, जिल्हा कार्यकारिणी सदस्य शफीक बागवान, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष अर्जुन भाई शेख, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरज बंडे, वीरसावकर मित्र मंडळाचे आदित्य कडिले, भाउसाहेब तेलोरे, केंद्रप्रमुख शकील बागवान, शफीक शेख, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका जुलेखा सय्यद, जैबा शेख, तबस्सुम शेख, शफीक शेख, शाहनवाज सय्यद तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
उर्दू शाळेसह जिल्हा परिषद मराठी शाळा, बेलापूर येथेही शफीक बागवान मित्र मंडळ व तालुका भाजप अल्पसंख्याक मोर्चा यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला.वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने सदर उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.
बेलापूर भाजप व वीर सावकर मित्र मंडळाकडून विविध शाळामध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम





