शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्र-मलेशिया दरम्यान व्यापक परस्पर सहकार्य – मंत्री रावल

---Advertisement---

· मलेशियाच्या महावाणिज्यदूत नजमा मुस्यरीफाह रामली यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई – सेमीकंडक्टर, अन्नप्रक्रिया आणि पायाभूत सुविधांसह विविध क्षेत्रांतील महाराष्ट्र-मलेशिया व्यापार सहकार्य अधिक व्यापक करू, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

मलेशियाच्या महावाणिज्यदूत नजमा मुस्यरीफाह रामली यांनी मंत्री रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत सेमीकंडक्टर व इलेक्ट्रॉनिक्स, औषधनिर्माण, रसायने, वाहन उद्योग, अन्नप्रक्रिया, कृषी पणन, बंदरे, महामार्ग आणि जलमार्ग क्षेत्रांतील व्यापार, उद्योग व गुंतवणुकीच्या संधींवर भर देण्यात आला.

उद्योगांना योग्य भागीदार आणि गुंतवणूक संधी उपलब्ध करून देण्यासाठी क्षेत्रनिहाय परिसंवाद आयोजित करण्याचा प्रस्ताव मलेशियाच्या प्रतिनिधींनी मांडला. यासाठी सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याची भूमिकाही दोन्ही बाजूंनी मांडण्यात आली.

मुंबई आणि पुण्यासह राज्यातील द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांमधील उद्योग व गुंतवणुकीसाठी संधी असल्याचे मंत्री रावल यांनी सांगितले. अन्नसुरक्षेसाठी पुरवठा साखळी मजबूत करणे, अन्नप्रक्रिया क्षेत्रातील सहकार्य वाढविणे तसेच कृषी व औषधी क्षेत्रात परस्पर देवाणघेवाण करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. पामतेल व्यापाराबरोबरच इतर कृषी आणि प्रक्रिया उद्योगांतील सहकार्य वाढविण्याची गरज दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आली. मलेशियन अभियांत्रिकी आणि बांधकाम कंपन्यांच्या सहभागातून बंदरे, पूल, इमारती व महामार्ग प्रकल्पांतील संधींचा शोध घेण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

मलेशियाच्या महावाणिज्यदूतांनी ‘व्हिजिट मलेशिया’ मोहिमेंतर्गत भारतातून १५ लाख पर्यटकांना आकर्षित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले. पर्यटन संस्था आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून पर्यटनासह व्यापार व गुंतवणूक संधींचा व्यापक प्रचार करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनमंत्री गणेश नाईक यांचे तातडीचे निर्देश!

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच प्राध्यापकांची जागतिक स्तरावरील संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी‘स्कॉलरली इंडेक्स्ड’च्या जागतिक क्रमवारीत डॉ. ए. एस. सय्यद यांचा ८१ वा क्रमांक

महात्मा फुले कृषि विद्यापीठात भरडधान्य प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

होम मिनिस्टर कार्यक्रमात पाणी वाचवावर महिलांमध्ये जनजागृती

बेलापूर भाजप व वीर सावकर मित्र मंडळाकडून विविध शाळामध्ये शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम

बालाजी देवस्थान ट्रस्टच्या दानपेट्यांतील रकमेची मोजदाद; निरीक्षणाखाली प्रक्रिया पूर्ण

Leave a Comment