अहमदपूर– स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा असून, त्यांचे विचार कायम प्रेरणादायी असून आजच्या तरुणांनी त्यांच्या विचार आत्मसात करून देशाप्रत्री कर्तव्य बजावले पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर येथे केले. अहमदपूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण व रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष स्वप्निल व्हते, प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेगणे, सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख ,धनंजय जोशी, शरद जोशी ,नगरसेवक अमित रेड्डी प्रशांत भोसले , सय्यद युसुफ भाई , प्रदीप कांबळे निखिल कासनाळे, संदीप चौधरी, अजिंक्य चामे , किरण बारमाळे ,शाम भगत, राम बेल्लाळे , चंद्रकांत उगीले, गोविंद गिरी, मधुकर धडे, अनिकेत काशीकर,बाळू पवार, संपन्न कुलकर्णी, अमोल पोळ सह विविध मान्यवर उपस्थित होते. यापुढे बोलताना सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले की, महापुरुषाचे जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे ते अत्यंत कौतुकास्पद असून रक्तदान ही काळाची गरज असून आपल्या रक्तदानामुळे एखाद्या गुणाचा जीव वाचू शकतो हे अत्यंत महत्त्वाचा आहे. अहमदपूर शहरातील विविध सामाजिक संघटनांनी रक्तदान शिबिरासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे असे सुद्धा सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर चौकाच्या सुशोभीकरण्यासाठी २० लाखाचा निधी सहकार मंत्री यांनी घोषित केला असून सध्या अर्धाकृती असेलेला पुतळा भविष्यात पूर्णकृती करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन डॉक्टर मधुसूदन पाटील चेरेकर यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा: सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील







