शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून विविध विकासकामांची पाहणी

---Advertisement---

छत्रपती संभाजीनगर दर्जेदार कामे करण्याचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यादरम्यान शहरातील विविध विकासकामांची पाहणी करून कामांच्या सद्यःस्थितीचा आणि प्रगतीचा आढावा घेतला. यामध्ये डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेली सारथी इमारत, महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या फेज-२ अंतर्गत सुरू असलेली बांधकामे, नेहरूनगर येथील मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसाठीची निवासी इमारत, नगरनाका ते पडेगाव सहापदरी रस्ता तसेच वाळूज–पंढरपूर–कॅम्ब्रिज–शेंद्रा एम.आय.डी.सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाचा समावेश होता.
या पाहणीदरम्यान संबंधित प्रकल्पांची सद्यःस्थिती, बांधकामाचा दर्जा, कामांची गुणवत्ता आणि उर्वरित कामांच्या प्रगतीची माहिती घेतली. सर्व कामे निर्धारित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक सूचना संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिल्या.
डॉ. हेडगेवार हॉस्पिटलजवळ उभारण्यात येत असलेल्या सारथी इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. या प्रकल्पांतर्गत प्रशासकीय इमारत (P+4), मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह (G+12) आणि अभ्यासिका (G+2) अशा चार इमारती उभारण्यात येत आहेत. मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहांमध्ये प्रत्येकी ५२८ विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाचा दर्जा राखून उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सारथी इमारतीचे उर्वरित बांधकाम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
नगरनाका ते पडेगाव या सहापदरी रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करून रस्त्याची गुणवत्ता, डांबरीकरण, ड्रेनेज व्यवस्था आणि कामाचा वेग यांचा आढावा घेतला. रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासोबतच निर्धारित वेळेचे पालन करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षलागवडही केली.
वाळूज–पंढरपूर–कॅम्ब्रिज–शेंद्रा एम.आय.डी.सी. या प्रस्तावित उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाची पाहणी करून सद्यःस्थितीची माहिती घेतली. या प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास, वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि दळणवळणाला गती मिळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आवश्यक बाबींचा आढावा घेतला.
या दौऱ्याप्रसंगी मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार विलास भुमरे, माजी खासदार भागवत कराड तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment