शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्रातील टॉप वन अधिकारी – पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड

---Advertisement---
  • शिक्षण क्षेत्रातील उच्चतम पदव्या संपादन
  • 31 पदव्या; 4 पीएच.डी, 6 परीक्षा, 3 पुरस्कार, 2 विशेष पदके, 1 पुस्तक; तर 15 शोधनिबंध प्रकाशित

अत्यंत सर्वसामान्य, गरीब कुटुंबातून वाड्या वस्ती आणि तांड्यातून आपल्या प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवत विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून वाटचाल करणाऱ्या एका झोपडीतील युवकाने प्रचंड कष्ट मेहनत जिद्द चिकाटी आणि घाम गाळून शिक्षण आणि साहित्यातून नवे क्षितिज निर्माण करत पोलीस अधीक्षकापर्यंत यशस्वीरित्या मारलेली मजल… एवढेच नाही तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील उच्चतम सर्वाधिक पदव्या संपादन करणारे… गरीब कुटुंबातील तरुणांसाठी साक्षात प्रेरणेचा स्त्रोत बनलेले डॉ.दत्ताराम राठोड यांचा अभिमान आहे!
डॉ.दत्ताराम जमुना उद्धव राठोड असे त्या शिक्षण आणि साहित्यात शिखर गाठलेल्या यशस्वी प्रशासनातील गुणी साहित्यिक विचारवंत अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत असलेले डॉ. दत्ताराम जमुना उद्धव राठोड हे पाथर्डी तालुक्यातील छोट्याशा गावातील असून छत्रपती संभाजी नगर स्थित आहेत.एक अभ्यासू आणि शिक्षण क्षेत्रातील कोहिनूर हिरा समजले जातात. त्यांनी अफाट परिश्रमातून घेतलेल्या पदव्या त्यांच्या शिक्षण प्रेमाची साक्ष देतात.
बी ए, एम ए मराठी, एम.बीए, एलएलबी, एल एल एम, पीएचडी मराठी, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ, एम ए इंग्रजी, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टीला लॉ, एम ए समाजशास्त्र, पदवी पत्रकारिता, एम ए लोकप्रशासन, प्रशासनातील नेतृत्व डिप्लोमा कोर्स, एम ए हिंदी, डिप्लोमा इन लेबर लॉ, एम ए फिलॉसॉफी, एम ए अर्थशास्त्र, एम ए जर्नालिझम, पीएच.डी. मराठी, शिक्षण शास्त्र पदविका, एम ए इतिहास, एम ए मानसशास्त्र, एम ए राज्यशास्त्र, एम ए अनुवंश शास्त्र, एम ए संस्कृत, एम एस सी भूगोल, ग्रामीण विकास पदव्युत्तर पदविका, मानवी हक्क पदविका प्रमाणपत्र, एवढ्या पदव्या त्यांनी संपादन केलेल्या आहेत.
तर प्रशासनातील अनेक महत्त्वाच्या परीक्षाही ते उत्तीर्ण झाले आहेत. पोलीस उपाधीक्षक- 2006, विक्रीकर निरीक्षक- 2007, एसीपी/ डी वाय एस पी- 2008, सहाय्यक विक्रीकर आयुक्त- 2010, UGC नेट परीक्षा- 2023, सेट परीक्षा- मे 2023.
या शैक्षणिक कर्तृत्वाबद्दल त्यांना सुशीला दत्तात्रय पुरस्कार रामचंद्र प्रतिष्ठान पुणे, ग्लोबल गोल्ड टॅलेंट ट्रस्ट राष्ट्रीय टॅलेंट पुरस्कार मुंबई, राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025 अमरावती आदी पुरस्कार प्राप्त आहेत.
नक्षलविरोधी अभियान मध्ये गडचिरोली नक्षलविरोधी सेवा केल्याबद्दल 2016 चा राज्य शासनाचा विशेष सेवा पदक सन्मान, नक्षलविरोधी अभियान गडचिरोली नक्षल विरोधी सेवा केल्याबद्दल 2016 केंद्र शासनाचा आंतरिक सुरक्षा पदक.
डॉ.दत्ताराम राठोड यांनी मराठी व तेलगू अनुबंध नावाचे पायगुण प्रकाशन अमरावती द्वारा पुस्तक ही 2023 मध्ये लिहिलेले आहे. अनेक विषयावर त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांचे वाचन आणि लेखन केलेले आहे. व्याख्याते, अभ्यासक आणि समुपदेशक म्हणूनही त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
एकूणच, सर्वसामान्य झोपडीतून असंख्य शिक्षण क्षेत्रातील विविध पदव्या संपादन करून ज्ञान संपन्न होण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत शिक्षण, सामाजिक संस्कृती व वैचारिक क्षेत्रा सह विविध माध्यमातून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.

प्रा.बिभिषण चाटे

केंद्र व राज्य शासनाचे विशेष सेवा पदक!
नक्षलविरोधी अभियान राबवून गडचिरोली येथे नक्षल विरोधी सेवा केल्याबद्दल 2016 मध्ये राज्य शासनाने विशेष सेवा पदक प्रदान करून सन्मान केला आहे; तर याच अभियानांतर्गत केंद्र शासनाने ही आंतरिक सुरक्षा पदक बहाल करून विशेष गौरव पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांचा केलेला आहे.
पदव्या, पुरस्कार आणि पदकांचे मानकरी!
प्रचंड मेहनत कष्ट आणि जिद्दीच्या बळावर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांनी 31 पदव्या, चार पीएचडी, सहा स्पर्धा परीक्षा, तीन पुरस्कार, दोन विशेष पदके, एक पुस्तक लेखन; तर पंधरा शोधनिबंध प्रकाशित केलेले आहे. ही प्रचंड उपलब्धी त्यांच्या प्रचंड कष्ट परिश्रम आणि बुद्धी कौशल्य या मूल्यांची द्योतक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment