शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

शनि जयंती

---Advertisement---

सूर्यपुत्र शनि देवता यांची आज जयंती म्हणजे जन्मदिवस आहे .शनी नाव घेतल्याबरोबर माणूस घाबरतो. विशेषतः साडेसातीमध्ये खूपच घाबरतो. परंतु माणसाने जर चांगले कर्म केले, गरिबांची सेवा केली ,अन्नदान केले तर शनिदेवता प्रसन्न होते. आपण सत्कर्म केले पाहिजे .आपले मन स्वच्छ पाहिजे .शनी ही न्यायाची देवता आहे ,ती दंड देणारी देवता आहे .गावामध्ये पीएसआय असतो .परंतु पीएसआय चांगले कर्म करणाऱ्या लोकांना त्रास देत नाही. जे वाईट कर्म करतात चोऱ्या करतात, दरोडे घालतात, सतत भांडण करतात, असत्य बोलतात त्यांच्यासाठी पीएसआय आहे .त्यांना तो दंड देतो. शनिदेवतेचे असेच आहे. सूर्य आणि छाया यांचा पुत्र म्हणजे शनि देवता आहे. शनीचे दर्शन घेताना नेहमी तिरके दर्शन घ्यावे शनीच्या पायाचे दर्शन घ्यावे. शनीच्या दृष्टीला दृष्टी लावू नये .रावणाने सर्व ग्रह आपल्या दरबारात पालथे केले होते .त्यांच्या पाठीवर पाय ठेवून तो चालत असे एका दिवशी तेथे नारद आले. आणि रावणाला म्हणाले, तू या ग्रहावरून पाठीवरून पाय ठेवून जात आहेस .त्यात विशेष काय. या ग्रहांना तू उलटेकर आणि त्यांच्या छातीवर पाय ठेवून जा. रावणाने सर्व ग्रह उलटे केले, आणि त्यांच्या छातीवर पाय ठेवून तो चालू लागला. शनीच्या छातीवर पाय देतानाच शनीची दृष्टी रावणावर पडली आणि रावणाचे पतन सुरू झाले .याचा अर्थ असा की आपण शनीच्या दृष्टीला दृष्टी देऊ नये .त्याच्या पायाचे दर्शन घ्यावे .शनी फक्त वाईटच फळ देतो ही सुद्धा एक भ्रामक समजूत आहे .कारण साडेसातीत आपण कसे वागतो हे महत्त्वाचे आहे. आपले बोलणे वागणे, ऐकणे हे कसे आहे, ते तामसी आहेत की सात्विक आहे यावर सर्व अवलंबून आहे. आपण पापे करायची आणि शनीच्या नावाने ओरडायचे असे चालत नाही .शनिला तेल अर्पण करतात. विशेषता तिळाचे तेल अर्पण करतात. याचे कारण देव दाणवांच्या युद्धामध्ये देवांनी तिळाचे तेल वापरून मशाली पेटवल्या होत्या. त्याच्यामागेही एक कथा आहे. शनिदेवतेला तेल का वाहतात ,एकदा मारुती आपल्या पूजेमध्ये मग्न असताना त्या ठिकाणी शनिदेव आले आणि त्यांनी मारुतीरायाला युद्धासाठी पुकारले .आपल्या शक्तीचा अहंकार शनिदेवतेला झाला होता. मारुतीरायाने शनिदेवतेला समजावून सांगितले .परंतु शनिदेवतेने ते ऐकले नाही .या युद्धामध्ये शनि देवाचे खूप हाल झाले ..शनिदेवता घायाळ झाली. सर्व शरीर त्यांचे ठणकू लागले. अंगावर घाव उमटले .मग मारुतीरायाने शनीच्या शरीरावरील घाव तेल लावून घालवले .त्यावेळी शनीला खूप बरे वाटले .तेव्हापासून शनी दर्शन घेताना आधी मारुतीचे दर्शन घ्यावे नंतर शनी दर्शन करावे. कारण मारुतीचे दर्शन झाल्यावर शनीची मात्रा चालत नाही, हे मी अनुभवाने सांगत आहे .मारुती ला शनि देवाने वचन दिले, तुझ्या भक्तांना मी त्रास देणार नाही ,शनि भगवान कृष्णांचे अनन्य भक्त होते. लहानपणापासूनच भगवान कृष्णांची आराधना ते करीत असे. शनि देवांची क्षमा याचना करताना आपण शनिचा मंत्र म्हणावा. शनिवारी तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल शनीला अर्पण करावे .काळे तीळ ,काळे उडीद अर्पण करतात. जे खरोखर गरीब आहेत त्यांना शनी जयंतीला जेऊ घाला ,मदत करा .जेवढे शक्य आहे तेवढे करा. साडेसाती आली म्हणून घाबरू नका .शनी दर्शन तर घ्यायचेच आहे परंतु आपली नियत चांगली असली पाहिजे. जे मारुतीचे भक्त आहेत त्यांनी शनीला घाबरण्याचे कारण नाही. आपले मन ,आपली वृत्ती स्वच्छ ठेवा .चांगले कर्म करा .शनिदेवता चांगलेच नक्की फळ देईल. एका विचारवंतांनी असे सांगितले आहे की ,आकाशातील ग्रह पृथ्वीवर माणसावर परिणाम करतात. यालाही एक शास्त्र आहे .परंतु त्यांना एवढी फुरसत आहे काॽ एवढा वेळ आहे काॽ इथे पृथ्वीवरच माणसा माणसांमध्ये अनेक ग्रह आहेत .आग्रह, दुराग्रह हटग्रह ,विग्रह ते आधी आपण बघावे .आपण मनोभावे शनीदेवाची भक्ती करावी. मारुतीरायाची भक्ती करावी. जो मनातून घाबरलेला आहे तोच शनिदेवतेला घाबरेल .चांगले कर्म पुण्य कर्म, गोरगरिबांची सेवा हे शनि देवाचे आवडते काम आहे. शनि जयंती निमित्त हा शब्द प्रपंच. शनिदेवता सर्वांना प्रसन्न होवो हीच शनिदेवतेकडे प्रार्थना.

प्रा. शशांक गंधे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment