शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन स्टोरी ऑफ द लेडी विथ लॅम्प – फ्लोरेन्स नाईटींगेल

---Advertisement---

आज १२ मे फ्लोरेन्स नाईटींगेल यांचा जन्मदिवस स्मृती दिन म्हणून पाळतो. त्य फक्त युध्दामध्ये जखमी सैनिकांची सेव करणारी नर्सच नसून एक देवदूत होत्या. फ्लोरेन्सचा जन्म इटलीच्या फ्लोरेन्स शहरात झाला त्यामुळे त्यांचे नाव फ्लोरेन्स ठेवले. त्या ब्रीटनमधील एका उच्चवर्गीय कुटूंबातील मुलगी होती.
शास्त्रीय शिक्षणाबरोबर त्यांना तत्वज्ञान आणि आधुनिक भाषा अवगत होत्या. लहानपणापासून त्या चपळ, शिक्षणाची धडपड व कुशाग्र बुध्दीच्या होत्या. त्यांना गणिताची खुप आवड होती. कुटूंबाने त्यांना १८३७ मध्ये युरोपच्या प्रवासाला नेले होते, त्यावेळी डायरीमध्ये महत्त्वाची टीपणे त्यांनी घेतली. असेच एकदा त्यांनी आपल्या आईवडीलांना सागिंतले की, मला देवाने मानवतेची सेवा करण्यास सुचवीले आहे. त्यावेळी आईवडील अस्वस्थ झाले, कारणे फ्लोरेन्स दिसायला खुप सुंदर, हुशार, श्रीमंताची मुलगी होती. तील चांगले श्रीमंत स्थळ पाहून लग्न करून द्यावे व तीची चांगली गर्हस्थी बसवावी अशी पालकांची इच्छा होती. पण त्यात फ्लोरेन्सला आवड नव्हती. त्यांनी नर्सिंग व्यवसायाचा हट्ट धरला. पालक नाराज झाले. बहीण पार्येनोपला जबरदस्त धक्का बसला. त्या काळात त्या व्यवसायाकडे चांगल्या दृष्टीकोनातून पाहीले जात नव्हते. परंतू कुटूंबाला उमजले होते की फ्लोरेन्सने निर्णय पक्का केला आहे. त्यामुळे शेवटी त्यांच्या मनाविरोधात जावून फ्लोरेन्सने नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. यात प्रावीण्य मिळविल्याने त्या लंडनमध्ये हार्ले स्ट्रीट हॉस्पीटलमध्ये नर्सिंगचे हेड झाल्या. १८५३ मध्ये क्रीमीयाचे युध्द सुरू झाले. या तअनेक ब्रीटीश सैन्य मारले गेले तर अनेक जखमी झाले. अशा या दुर्दशेच्या अवस्थेत ब्रीटनचे युध्द मंत्री हर्बर्ट यांनी या हुशार अशा फ्लोरेन्सबरोबर इतर ३८ परिचारीका तूर्कीच्या करकारी रूग्णालयात धाडण्यात आल्या. त्यावेळी दूर्दैवी अवस्थ होती. सर्व हॉस्पीटलमध्ये अस्वच्छता सर्व मजल्यावर विष्ठा व लघवीचा वास पसरलेला होता. ही दुर्दशा पाहून लगेचच फ्लोरेन्स व सहकारी परिचारीका यांनी प्रथम हॉस्पीटलची स्वच्छता केली. सर्व रूग्णांना स्वच्छ अंघोळ स्वच्छ कपड घालण्यात आले. तरीही सैनिकांची मृत्युची संख्या वाढतच होती. त्यांनी महत्त्वाची लेक बोलावून त्यांची बैठक घेवून मदतीचे आवाहन केले व त्यांना समजावून सांगितले की, रूग्ण बरे होण्यसाठी फक्त मेडीकल व नर्सिंग केअर महत्वाची नसून त्या बरोबर, रूग्णांना चांगला सकस आहार, वैयक्तीक स्वच्छता, मोकळी व शुध्द हवा, स्वच्छ वातावरण, माणसिक आधार, स्वच्छ पीण्याचे पाणी, योग्य झोप व विश्रांती य सर्व गोष्टी महत्वाच्य आहेत. हे पटवून देण्यासाठी त्यांनी आकडेवारी, डेटा गोळा केला. त्यामुळे सर्वांनी त्यांना सहकार्य केले. मृत्युसंख्या २४ टक्यांवरून २ टक्यांवर आली.
यासाठी त्यांनी आतोनात कष्ट घेतले. वीज नव्हती म्हमून त्या रात्री सुध्दा रूग्णांना बघण्यासाठी दिवा घेवून जात. देखभाल व चौकशी करत. म्हणून त्यांना लेडी वीथ लॅम्प म्हटले जाते. रूग्ण त्यांच्यावर भरभरून प्रेम करीत. त्यांच्या सावलीचे नमन करीत व त्यांना देवदूत मानीत असत. अशा प्रकारे नर्सिंग व्यवसायाची सुरूवात झाली.
डॉ. संगिता विखे,
परिचारीका अधिक्षक, प्रवरा मेडीकल ट्रस्ट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment