शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भोंदू खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

---Advertisement---
  • मुलगा ताब्यात तर पत्नी फरार

नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असताना आज न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. अशोक खरातला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यापूर्वी त्याची पोलिस कोठडी संपत असल्याने विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) पुन्हा कोठडी वाढवण्याची मागणी केली गेली. मात्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देत तपासाच्या पुढील टप्प्याला वेगळे वळण दिले आहे. त्याच्याविरोधात लैंगिक अत्याचार, आर्थिक फसवणूक आणि इतर गुन्ह्यांच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत.”
“दरम्यान, काल रात्री उशिरापर्यंत खरातच्या घराबाहेर नाट्यमय घडामोडी घडल्या. शिर्डी येथील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र एसआयटीचे पथक पोहोचण्यापूर्वीच कल्पना खरात फरार झाली. दुसरीकडे, खरातचा मुलगा हर्षवर्धन याला पोलिसांनी घरातून ताब्यात घेतल्याने या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले आहे.”
“तपासादरम्यान अशोक खरात अपेक्षित सहकार्य करत नसल्याचा आरोप एसआयटीकडून करण्यात आला आहे. त्यामुळे तपास पुढे नेण्यासाठी त्याच्या मुलासमोरच चौकशी करण्याची तयारी होती. खरातकडून अधिक माहिती मिळवून फरार पत्नीचा शोध घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यानंतर आर्थिक व्यवहार आणि फसवणुकीच्या बाबींची सखोल चौकशी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.”
“याचवेळी एसआयटीने तपासाचा फास अधिक घट्ट करत विविध संबंधितांची चौकशी सुरू ठेवली आहे. खरातचा चार्टर्ड अकाउंटंट, ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाची कसून चौकशी करण्यात आली. आर्थिक व्यवहार, मंदिरातील हालचाली आणि संभाव्य गैरव्यवहार याबाबत महत्त्वाचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment