शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सावरगाव सिंचन योजनेतील अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी : मंत्री छगन भुजबळ

---Advertisement---

निफाड तालुक्यातील सावरगाव साठवण तलाव योजनेचा आढावा

नाशिक: निफाड तालुक्यातील मौजे सावरगाव येथील प्रलंबित सिंचन योजनेच्या कामांमध्ये येत असलेल्या विविध अडचणी तातडीने सोडवून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.यावेळी लासलगाव बाह्य वळण रस्ता भूसंपादन,देवना साठवण तलाव ता. येवला जमीन वळतीकरण प्रस्ताव या प्रकल्पांबाबत सुद्धा आढावा घेण्यात आला.
सावरगाव सिंचन योजनेबाबत विविध अडचणी व आवश्यक प्रलंबित परवानग्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत,जिल्हा जलसंधारण अधिकारी राजाराम झुरावत,निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे,उपविभागीय अधिकारी चांदवड,जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव, वन विभाग,भूमी अभिलेख नगररचना आदी विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे,दत्ता रायते आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.भुजबळ यांनी या योजनेअंतर्गत सरकारी क्षेत्र हस्तांतरण, वीज वाहिन्यांचे स्थलांतर, भूसंपादन प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांची संमती, तलाव क्षेत्रातील नोंदी व पोहोच रस्त्याच्या प्रस्तावासंदर्भातील विविध मुद्द्यांचा आढावा घेतला.
योजनेसाठी आवश्यक असलेल्या सरकारी क्षेत्र हस्तांतरणाबाबत जिल्हास्तरावर कार्यवाही सुरू असून संबंधित विभागाने तातडीने आदेश निर्गमित करावेत. देवरगाव व खडकमाळेगाव या गावातील भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांच्या घळभरणी संमती संदर्भातील बाबी त्यांच्याशी समन्वय साधून मार्गी लावाव्यात. यासोबतच तलाव क्षेत्रात नोंद असलेल्या जुन्या यंत्रसामग्रीबाबत आवश्यक नोंदी अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
योजनेअंतर्गत तलाव ते मौजे सावरगाव येथील रस्त्यास मंजूरी प्राप्त असून काही कि.मी. रस्ता वनक्षेत्रातून जात आहे. त्याकरिता 3-2 प्रस्ताव तयार करणे आवश्यक असून तो तातडीने सादर करून संबंधित विभागांनी आवश्यक मंजुरी प्रक्रिया पूर्ण करावी. संबंधित विभागांनी प्रलंबित बाबींवर वेळेत कार्यवाही करून योजना पूर्णत्वास नेण्यासाठी समन्वय राखावा, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment