नेवासा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांचा सय्यम अखेर संपला असून आपल्या प्रलंबित आणि न्याय मागण्याकडे शासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे पंचायत समिती नेवासा येथील गटविकास अधिकारी लखवाल साहेब व तसेच तहसीलदार बिराजदार साहेब नेवासा यांना सविस्तर निवेदने देत ग्रामरोजगार सहाय्यकाने दिनांक एक एप्रिल 2026 पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची स्पष्ट घोषणा केली आहे त्यामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील रोजगार हमीची कामे ठप्प होण्याच्या शक्यता निर्माण झाले आहे निवेदनात नमूद केल्याप्रमाणे दिनांक 2 मे 2011 रोजीच्या शासन निर्णयामध्ये ग्रामरोजगार सहायकांना अर्धवेळ कर्मचारी म्हणून नमूद करण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून पूर्ण वेळ स्वरूपाचे काम करून घेतले जात असल्याने त्या निर्णयामध्ये तातडीने दुरुस्ती करून पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता देण्याचे मागणी करण्यात आली आहे त्यासोबत दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या ग्राम रोजगार सेवक मानधन वाढीच्या शासन निर्णयाची अद्याप प्रत्यक्ष मलबजावणी झालेली नाही त्यामुळे राज्यभरातील ग्राम रोजगार सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी वातावरण निर्माण झाले असून अनेक वेळा निवेदने देऊनही शासनाकडून कोणतेही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे वारंवार पाठपुरावा वारंवार पाठपुरावा करूनही मत करू नये प्रश्न प्रलंबित राहिल्याने अखेर नाईलाजस्व आंदोलनाचा मार्ग स्विकारावे लागत असल्याचे ग्रामरोजगार सहायक यांनी स्पष्ट केले आहेत
दरम्यान १ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या या बेमुदत संपामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे ठप्प होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तसेच या कालावधीत कामकाजावर होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाचे राहील असा इशारा ग्राम रोजगार सहाय्यकाने दिला आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश उभेदळ योगेश डावखर बाबासाहेब पवार लेहाण मामा अविनाश लासे जालिंदर आदमने त्रिंबक पवार शिवाजी दहातोंडे भारत ल॔घे प्रदीप जगधने सुरेश घुंगासे सह तालुक्यातील मोठ्या संख्येत ग्रामरोजगार सहाय्यक उपस्थित होते.
नेवासा तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यक यांचा एक एप्रिल पासून संपाचा इशारा











