शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताना कोपरगावच्या अनामिका आहेरची ऐतिहासिक सुवर्ण कामगिरी; राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचा झेंडा उंचावला..

---Advertisement---

कोपरगाव (गौरव डेंगळे): कोपरगाव शहरासाठी अत्यंत अभिमानाची,गौरवशाली आणि ऐतिहासिक अशी बातमी समोर आली आहे. सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव येथील गुणवंत विद्यार्थिनी अनामिका आहेर हिने राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले आहे.
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे दिनांक २ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान १७वी राष्ट्रीय ड्रॉप रोबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.या स्पर्धेत उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आदी विविध राज्यांतून शेकडो खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. देशभरातील अव्वल खेळाडूंच्या उपस्थितीत स्पर्धेची पातळी अत्यंत उच्च दर्जाची होती.
अशा कडव्या स्पर्धेत अनामिका आहेर हिने ज्युनिअर गटात अप्रतिम खेळ करत सुवर्णपदक पटकावले. तिच्या अचूक कौशल्य,चपळता आणि आत्मविश्वासपूर्ण खेळामुळे तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत महाराष्ट्रासाठी विजय संपादन केला.ही कामगिरी केवळ कोपरगावसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
याच स्पर्धेत कोपरगावचीच दुसरी खेळाडू वैष्णवी लोखंडे हिने सब-ज्युनिअर गटात रौप्यपदक जिंकून कोपरगावच्या यशात भर घातली. दोन्ही खेळाडूंनी महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट सांघिक आणि वैयक्तिक कामगिरी सादर केली.या उल्लेखनीय यशामुळे श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल तसेच कोपरगाव शहराचा नावलौकिक वाढला असून सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सोमैया ट्रस्टचे अध्यक्ष समीर सोमैया, गोदावरी बायो रिफायनरीचे सुहास गोडगे, प्राचार्य के. एल. वाकचौरे,.दिनेश अहिरे,शैलेंद्र सोनजे,विलास निरभवणे
भारतीय ड्रॉप रोबॉल सचिव दत्तगिरी गोसावी,उपप्राचार्या सौ. शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नाथलीन फर्नांडिस तसेच क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर यांनी खेळाडूंचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशामागे प्रशिक्षक गणेश वाघ आणि गणेश मोरे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या नियोजनबद्ध प्रशिक्षण,शिस्तबद्ध सराव आणि खेळाडूंवरील विश्वासामुळेच अनामिका आहेर हिने राज्य पातळीवरून राष्ट्रीय स्तरावर झेप घेत सुवर्ण यश संपादन केले.
अनामिका आहेर हिने दाखवून दिले की, जिद्द,कठोर परिश्रम आणि योग्य मार्गदर्शन यांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते.तिची ही ऐतिहासिक कामगिरी भविष्यातील अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरणार आहे.आता येणाऱ्या स्पर्धांमध्येही ती महाराष्ट्रासाठी आणखी यश संपादन करेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment