मुंबई : दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या ओव्हल मैदान, चर्चगेट आणि माहुल, चेंबूर येथील केंद्रामध्ये निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे. ओव्हल मैदान येथील निवड चाचणी ६ आणि ७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.०० ते ६.०० या कालावधीत घेण्यात येणार आहे. या चाचणीमध्ये १२, १४, आणि १६ वर्षाखालील अशा वयोगटासाठी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. चेंबूरच्या माहुल येथील अकादमीसाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी याच प्रकारे दुपारीं ३.०० ते ६.०० दरम्यान १२, १४ आणि १६ वर्षाखालील मुलांना या निवड चाचणीत भाग घेता येईल. निवड चाचणीसाठी सहभागी होणाऱ्या मुलांनी संपूर्ण पांढऱ्या क्रिकेट गणवेशात आणि आपल्या वयाच्या दाखल्यासह उपस्थित राहावे.
१६ वर्षाखालील वयोगटासाठी ०१/०९/२०१० ते ३०/०८/२०१२ या कालावधीत जन्मलेली मुले सहभागी होऊ शकतील.
१४ वर्षाखालील वयोगटासाठी ०१/०९/२०१२ ते ३०/०८/२०१४ या कालावधीत जन्मलेली मुले सहभागी होऊ शकतील.
१२ वर्षाखालील वयोगटासाठी ०१/०९/२०१४ ते ३०/०८/२०१६ या कालावधीत जन्मलेली मुले सहभागी होऊ शकतील.











