मुंबई : मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्यावतीने व लोकमान्य मंडळ, माटुंगा यांच्या सहकार्याने २३ वी मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा – २०२६ चे आयोजन १६ व १७ मे २०२६ रोजी लोकमान्य मंडळ ( वातानुकूलित हॉल ), जे. के. सावंत मार्ग, मनमाला मंदिर व मुंबई महानगरपालिका मनमाला टँक शाळेसमोर, माटुंगा ( पश्चिम ), मुंबई – ४०० ०१६ येथे करण्यात आले आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांमध्ये हि स्पर्धा रंगणार असून स्पर्धेतील विजेत्यांना ६० हजारांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व महापौर चषक देऊन गौरविण्यात येईल.
स्पर्धा मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनला संलग्न असलेल्या मुंबई शहरातील खेळाडूंसाठी असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी खेळाडूंनी आपली नावे संलग्न क्लब मार्फत प्रवेश अर्ज व स्पर्धा शुल्कासहित मंगळवार दिनांक ५ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन, पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, माहिम, मुंबई – ४०० ०१६ येथे नोंदवावीत. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ येथे संपर्क साधावा.
23 वी मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धा 16 मेपासून माटूंग्यात रंगणार








