शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जान्हवी मोरे स्मृती चषक कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

---Advertisement---

ठाणे : डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू स्व. जान्हवी सुनिल मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षाखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने मुला-मुलींच्या गटात विजेते पदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर येथील १०० पेक्षा जास्त कॅरमपटू सहभागी झाले होते. दोन्ही गटात प्रथम ८ क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची पारितोषिके, चषक, पदके देण्यात आली. एकूण १८ हजार रुपये रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. मुलांच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या सुसंस्कार हायस्कुलच्या ओमकार वडरने ठाण्याच्या आय.इ.एस. चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या प्रसाद मानेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पुण्याच्या आर्यन वर्ल्ड स्कुलच्या आयुष गरुडने ठाण्याच्या आय. इ. एस चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या नील म्हात्रेचा पराभव केला.मुलींच्या निर्णायक सामन्यात रत्नागिरीच्या आर. बी. शिर्के हायस्कुलघ्या स्वरा कदमने मुंबई उपनगरच्या कानोसा कॉन्व्हेंट हायस्कुलच्या वेदिका पोमेंडकरचा देखील २ सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबई उपनगरच्या महात्मा गांधी विद्यामंदिराच्या तनया दळवीने सिंधुदुर्ग, सावंतवाडीच्या मुक्ताई अकॅडमीच्या साक्षी रामदूरकरचा पराभव केला. विजेत्या ओमकार, स्वराला रोख रुपये ३ हजार आणि चषक देऊन गौरविण्यात आले. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे यांचे मोलाचे सहकार्य स्पर्धा आयोजकांना मिळाले. आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. माजी विश्व विजेते कॅरमपटू योगेश परदेशी, आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संजय मांडे यांच्या हस्ते स्पर्धेचा बक्षिस समारंभ संपन्न झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment