शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

राष्ट्रीय पातळीवरील आर्टिकल रायटिंग स्पर्धेत प्रवरा फार्मसीचा तृतीय क्रमांक

---Advertisement---

लोणी – लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा ग्रामीण औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एमएबीडी फार्मसी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय स्तरावरील आर्टिकल रायटिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे, अशी माहिती प्राचार्या डॉ. मंगथायारू के. यांनी दिली.
अॅकॅडमिक डिसीफरच्या सहकार्याने ‘नॅनो टेक्नॉलॉजी बेस्ड ड्रग डिलिव्हरी सिस्टिम’ या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशभरातून या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे ७० महाविद्यालयांमधील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, लेखन कौशल्य आणि नवोपक्रमाची जाणीव वाढीस लागली असून हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरल्याचे मत सहभागी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
प्रवरा महाविद्यालयाच्या कु. विशाखा देशमुख, अंजली गवळी आणि पायल गिते यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना प्रा. शुभम मनकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांच्यासह प्राचार्या डॉ. के. मंगथायारू व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment