शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा

---Advertisement---

अद्वैत कचराज, आरव यादव यांच्या नाबाद शतकांमुळे गावस्कर आणि तेंडुलकर संघाला आघाडी

मुंबई : मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा दिवस देखील फलंदाजांनी गाजवला. ओव्हल येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर गावस्कर संघाने वेंगसरकर संघाच्या १९१ या धावसंख्येचा पाठलाग करताना अद्वैत कचराज याच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे ७ बाद २७५ धावा करत पहिल्या डावातील आघाडीचे गुण वसूल केले. क्रॉस मैदान येथील कर्नाटक सपोर्टींग मैदानात तेंडुलकर संघाचा कर्णधार आरव यादव याने आज नाबाद १७८ धावा करताना शास्त्री संघाच्या पहिल्या डावातील २५१ या धावसंख्येस ५ बाद ३३२ असे चोख उत्तर दिले आणि पहिल्या डावातील आघाडीचे गुण मिळविले.
कर्नाटक सपोर्टींग येथे शास्त्री संघाच्या २५१ धावांचे लक्ष्य समोर असताना तेंडुलकर संघाने आज २ बाद ९२ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. नीयांश मारू (८०) आणि कर्णधार आरव यादव (नाबाद १७८) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १५२ धावांची भागी रचली तर नंतर नीरज सिंग (२५) याच्या साथीने चौथ्या विकेटसाठी आणखी ९१ धावांची भागीदारी करताना प्रतिस्पर्धी संघावर आघाडी घेतली. आरव यादव याने संयम आणि आक्रमण यांचा योग्य मिलाफ साधताना १५८ चेंडूत १९ चौकार आणि २ षट्कारांसह नाबाद १७८ धावांची खेळी केली. तेंडुलकर संघाने ५ बाद ३३२ धावांवर आपला डाव घोषित करून दुसऱ्या डावात शास्त्री संघाचे ११३ धावांत ४ बळी देखील मिळविले.
ओव्हल मैदानावरील लढतीत गावस्कर संघाच्या अद्वैत कचराज आणि लाविष सिंग (७२) या जोडीने चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागी रचली तर अद्वैत याने रितेश शॉ (५०) याच्या सह सहाव्या विकेटसाठी आणखी ८८ धावांची भर टाकत पहिल्या डावातील आघाडी मिळविली. दरम्यान अद्वैत कचराज याने २५१ चेंडूत ११ चौकारांसह नाबाद १०० धावा केल्या. दुसऱ्या डावात डावखुरा फिरकी गोलंदाज नीरज पनवर याने पुन्हा एकदा प्रभावी गोलंदाजी करताना १३ धावांत ३ बळी मिळवत वेंगसरकर संघाला ४ बाद ७९ वर रोखले.
संक्षिप्त धावफलक – (ओव्हल मैदान ) वेंगसरकर संघ – ४९.३ षटकांत सर्वबाद १९१ आणि ३२ षटकांत ४ बाद ७९ ( स्वस्तिक मालवणकर ३१; नीरज पनवर १३ धावांत ३ बळी) वि. गावस्कर संघ – ९१.१ षटकांत ७ बाद २७५ डाव घोषित (निखिल अहिरवाल 27, अद्वैत कचराज नाबाद १००, लविष सिंग ७२, रितेश शॉ ५०,; विहान वाडे ४५ धावांत ३ बळी, नयन साळुंखे ७७ धावांत २ बळी)
(कर्नाटक सपोर्टींग-क्रॉस मैदान) – शास्त्री संघ – ५६.४ षटकांत सर्वबाद २५१ आणि ४ बाद ११३ ( अर्णव शेलार ४०, कार्तिक छाजेर नाबाद ३३, अक्षद जोशी नाबाद २२; अमर बी.के. ४४ धावांत ३ बळी) वि. तेंडुलकर संघ – ७९ षटकांत 5 बाद ३३२ डाव घोषित (नीयांश मारू ८० , आरव यादव नाबाद १७८ ; नक्ष दर्जी ३२ धावांत २ बळी) .

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment