शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

एन.एम.एम.एस. परीक्षेत लोणीच्या रयत संकुलाचा डंका; डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

---Advertisement---


लोणी: राहता येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या रयत संकुल लोणी संचलित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालयाने एन.एम.एम.एस. (NMMS) परीक्षेत घवघवीत यश मिळवत आपल्या गुणवत्तेचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निवड यादीत विद्यालयातील तब्बल २४ विद्यार्थ्यांनी आपले स्थान निश्चित केले असून शैक्षणिक वर्तुळात या यशाचे मोठे कौतुक होत आहे. या परीक्षेत सार्थक गायकवाड याने १५८ गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर आनंद रासकर याने १५७ गुण मिळवून द्वितीय आणि कु. साईशा मगर हिने १५५ गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला आहे. या तिन्ही विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेची निवड यादी २४ एप्रिल २०२६ रोजी जाहीर करण्यात आली. ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या अत्यंत चुरशीच्या परीक्षेत विद्यालयातील इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे विशेष मानले जात आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयातील तज्ज्ञ शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. ‘रयत’च्या या यशस्वी परंपरेमुळे लोणी आणि परिसरातील पालकांनी समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थ्यांच्या या यशाने संकुलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment