मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'खतरनाक ' साप्ताहिकाच्या संपादिका सोनल खानोलकर यांना “महापौर पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. गेल्या ३२ वर्षांच्या पत्रकारिता व सामाजिक कार्याच्या प्रवासात मनामध्ये “जाणीव” निर्माण करण्यासाठी सोनल यांनी केलेल्या प्रयत्नांची आज दखल घेण्यात आली.हा सन्मान महापौर सौ. रितू तावडे यांच्या हस्ते प्राप्त झाला तसेच उपमहापौर संजय घाडी, मनपाच्या उपायुक्त डॉ. प्राची जांभेकर, तसेच सौ. यामिनी यशवंत जाधव , नगरसेविका सौ. सुप्रिया दिलीप दळवी आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला