महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने रविवार दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान एक दिवसीय पंच शिबिराचे आयोजन दादर येथील एल जे ट्रेनिंग सेंटर ( वातानुकूलित ) येथे करण्यात आले आहे. राज्यात पंच म्हणून काम करणाऱ्यांसाठी सलग चौथ्या वर्षी या विनाशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात आंतर राष्ट्रीय पंच अजित सावंत, केतन चिखले, परविंदर सिंग तसेच आशिष बागकर शिबिरार्थींना मार्गदर्शन करणार आहेत. फक्त ४० पंचांना या शिबिरात प्रवेश देण्यात येणार असून प्रथम नाव नोंदविणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल.