हार्दिक गजमलच्या 6 विकेट, आदित्य सिंगच्या 56 चेंडूंत 95 धावा
मुंबई : 34 व्या एलआयसी कल्पेश कोळी स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेत विरार सेंटरने बोईसर सेंटरवर डाव आणि १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ऑफस्पिनर प्रेरित राऊत याने पहिल्या डावात १५ धावांत ६ बळी घेतले, तर हार्दिक गजमलने ३ बळी मिळवत बोईसरला ११४ धावांत रोखले. दुसऱ्या डावात हार्दिक गजमलने ६ बळी घेत निर्णायक कामगिरी केली. फलंदाजीत आदित्य सिंगने ५६ चेंडूत ९५ धावांची झंझावाती खेळी केली.
दादर पारशी झोराष्ट्रियन सीसी येथे झालेल्या कमी धावांच्या सामन्यात कल्याण सेंटरने पहिल्या डावातील आघाडी मिळवूनही दुसऱ्या डावात ५६ बिनबाद धावा करून डाव घोषित केला, मात्र त्यांना अखेरीस पराभव पत्करावा लागला.
चर्चगेट केंद्र विरुद्ध विरार केंद्र आणि एमसीए अकॅडमी केंद्र विरुद्ध ठाणे केंद्र यांच्यातील उपांत्य फेरीचे सामने १९ व २० मे २०२६ रोजी माटुंगा येथील रमेश दडकर मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.
गट अ
बोरिवली केंद्र विरुद्ध चर्चगेट केंद्र
सचिन तेंडुलकर जिमखाना, कांदिवली
बोरिवली केंद्र : १९६ आणि १८ षटकांत ५ बाद ८२ (अंश सोनावणे नाबाद ३९)
पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध
चर्चगेट केंद्र :७८.५ षटकांत सर्वबाद २९७(आरुष कोल्हे ७२, कबीर जगताप ७२, निखिल गुरव ३५, शार्दूल फगरे ३१,शौर्य काटकडे ३/५२, तस्मय परब ३/५३)
सामनावीर : निखिल गुरव
कांदिवली केंद्र विरुद्ध कालिना केंद्र ,एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, कालिना
कालिना केंद्र: ८१ षटकांत ६ बाद ३२८ घोषित (सत्यम यादव ९६, श्रेयस खिलारे ९५, जियान काळे ६१, निर्वाण शाह ४९),पहिल्या डावावर विजयी विरुद्ध कांदिवली केंद्र : ४५.४ षटकांत सर्वबाद १०९ (संचित गावडे ३६,प्रियांश दाणी ३/१९, अर्णव भुजबळ ३/२३, आवेश खिलारे ३/३२)आणि २५ षटकांत ३ बाद ११२
सामनावीर : श्रेयस खिलारे
गट ब
एमसीए अकॅडमी केंद्र विरुद्ध वाशी केंद्र
नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी
वाशी केंद्र: १३१ आणि ५३.२ षटकांत ९ बाद २१२ घोषित (समीक्ष नायर ४७, आयुष वरंकर ४४,अद्वै चौधरी ३/२९, राजवीर लाड ३/५०), पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध एमसीए अकॅडमी केंद्र: ४२.५ षटकांत १७८ (देवाशीष घोडके ७६,आयुष वरंकर ५/२६, सूरज चव्हाण ३/४६)आणि १२.५ षटकांत १ बाद ३३
सामनावीर: राजवीर लाड
माटुंगा केंद्र विरुद्ध घाटकोपर केंद्र,आरसीएफ स्पोर्ट्स क्लब, चेंबूर
माटुंगा केंद्र: ३२.५ षटकांत सर्वबाद १३२(शुभम जायसवाल ५०,अद्वित तिवारी ४/२१, शौर्य नवले ४/१६)आणि ७२ षटकांत ४ बाद २५५ (शुभम जायसवाल ७५, हृदान ठक्कर नाबाद ६३, अयान्श चिटकारा ४७, आयुष कुमार ३२)
पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध घाटकोपर केंद्र: ५५.२ षटकांत सर्वबाद १८८(अद्वित तिवारी ६७, शौर्य स्वामी ३०,आदित्य पांडे ७/५६)
सामनावीर : अद्वित तिवारी
गट क
डोंबिवली केंद्र विरुद्ध बदलापूर केंद्र,माटुंगा जिमखाना
बदलापूर केंद्र: ६२.२ षटकांत सर्वबाद १८९(अर्णव निकळजे ६५, आयुष कचवे ३२,अर्णव संत ४/२८, स्वरूप आंब्रे ३/४६)आणि २९.५ षटकांत सर्वबाद ९८ (अर्णव संत ३/२१, स्वरूप आंब्रे ३/१७) विरुद्ध डोंबिवली केंद्र : ४४.४ षटकांत सर्वबाद १६४(स्मित पोमेंडकर ५९,अर्णव निकळजे ५/४१)आणि ७ षटकांत २ बाद ७८
सामनावीर :अर्णव निकळजे
कल्याण केंद्र विरुद्ध ठाणे केंद्र,डीपीझेड सीसी, माटुंगा
कल्याण केंद्र: २१७ आणि ५६ बिनबाद घोषित(सार्थ पाटील नाबाद ३१)
विजयी विरुद्ध ठाणे केंद्र: ४४.१ षटकांत सर्वबाद १७० (आर्यन पवार ४०, सर्वेश भोईर नाबाद ३२,दर्शन राठोड ६/३९, सृजन बोर्से ३/३६) आणि ११.१ षटकांत ४ बाद १०२ (निरव भोरकर नाबाद ५५)
सामनावीर : निरव भोरकर
गट ड
पालघर सेंटर केंद्र मीरा रोड केंद्र,अवर्स क्रिकेट क्लब, विरार
मीरा रोड केंद्र: १८० आणि ८ बाद २२९ घोषित (विवेक स्वेन ६२, आकाश त्रिपाठी ६१, लॉसन सेरेजो ४४,अभिरूप पाटील ५/४९)पहिल्या डावावर विजयी विरुद्ध पालघर सेंटर: ३३.१ षटकांत सर्वबाद १३७(आदी घरत ३६,आकाश त्रिपाठी ३/३५)आणि २० षटकांत २ बाद १२४(लाभ सांबरे ६१, रित्विक घरत नाबाद ४९)
सामनावीर: ह्रीधान बांभणीया
बोईसर केंद्र विरुद्ध विरार केंद्र,साईनाथ स्पोर्ट्स क्लब
बोईसर केंद्र : ३९.४ षटकांत सर्वबाद ११४(निहाल खान ५०, हर्ष पाटील ४०,प्रेरित राऊत ६/१५, हार्दिक गजमल ३/३०) आणि ३७.१ षटकांत सर्वबाद १०३ (युवराज चौबे ३१, ओम धामणेकर ३१,हार्दिक गजमल ६/४६) पराभूत विरुद्ध विरार केंद्र: ६९.४ षटकांत सर्वबाद ३२४ (आदित्य सिंग ९५, वासिफ शेख ५५, प्रेरित राऊत ३३, ओंकार नाईक ३१,निमिष देव ४/५९, हर्ष पाटील ३/९३)
सामनावीर: प्रेरित राऊत








