शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

LIC कल्पेश गोविंद कोळी स्मृतीक्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ

---Advertisement---
  • राजवीर लाडने घेतल्या ९ विकेट

मुंबई : न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरू झालेल्या ३४व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पहिल्याच दिवशी लेगस्पिनर राजवीर लाडने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एमसीए अकादमी केंद्राच्या राजवीरने ९ बळी टिपत घाटकोपर केंद्राचा डाव १०८ धावांवर संपुष्टात आणला.
चेंबूर येथील आरसीएफ मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना घाटकोपर केंद्राचा डाव राजवीर लाडच्या गोलंदाजीसमोर गडगडला. सलामीवीर विकास साराफ याने उत्कृष्ट फलंदाजी करत ३९ धावा केल्या, मात्र इतर फलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. तत्पूर्वी, भारतीय महिला संघाची क्रिकेटपटू सायली सातघरे, एलआयसीचे प्रशासकीय अधिकारी योगेंद्र वैती, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सचिव भास्कर अय्यर तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे निवड समिती सदस्यांच्या उपस्थितीत माटुंगा येथील रमेश दडकर मैदानात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
कलिना येथील एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या सामन्यात चर्चगेट सेंटरचा डावखुरा फिरकी गोलंदाज जय म्हात्रे याने अवघ्या २६ धावांत ५ बळी घेत कलिना केंद्राचा डाव अवघ्या ९० धावांवर गारद केला. कलिना केंद्राच्या श्रेयस खिलारेने ३४ धावांचे योगदान दिले. त्यानंतर पहिल्या दिवसअखेर चर्चगेट केंद्राने ७ बाद १२५ धावा करत आघाडी घेतली आहे. चर्चगेट केंद्राकडून धैर्य पाटीलने ३३ तर शार्दूल फगारेने ३१ धावा फटकावल्या. कलिनाच्या श्रेयस नाईकने चार बळी टिपले.
माटुंग्याच्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या खेळपट्टीवर झालेल्या सामन्यात कांदिवली केंद्राने ६०.२ षटकांत २२६ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या लोविश बाली (६८), कान्हा उपाध्याय (६१) आणि हृदान खराडेने (३१) चांगली कामगिरी केली. बोरीवली केंद्राच्या कुणाल शर्मा आणि अब्दुल्ला खत्री यांनी प्रत्येकी चार विकेट्स मिळवले. त्यानंतर बोरीवली केंद्राने दिवसअखेर २ बाद ५९ धावा केल्या आहेत.
माटुंग्यातील डीपीसीसीच्या मैदानावर झालेल्या डोंबिवली केंद्राविरुद्धच्या सामन्यात ठाणे केंद्राने अथर्व गावडे (५५), हर्ष कदम (४३) आणि तन्मय मालुसरे (४१) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर ५८.१ षटकांत २२५ धावा उभारल्या. डोंबिवली केंद्राकडून स्वरूप आंब्रेने चार गडी टिपले.

(मुंबई क्रिकेटची परंपरा जपताना, ३४ वी LIC कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे आज भव्य उद्घाटन Sayali Satghare यांच्या हस्ते झाले. यावेळी LIC चे प्रशासकीय अधिकारी योगेंद्र वैती आणि JSW चे रणजीत पिल्लई यांचीही प्रमुख उपस्थिती होती. हा सोहळा मुंबईतील दादकर मैदानावर उत्साहात पार पडला.)

🔹 ग्रुप अ
१. बोरीवली केंद्र vs कांदिवली केंद्र
📍 न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब, माटुंगा
कांदिवली केंद्र : ६०.२ षटकांत २२६ ( लोविश बाली ६८ , कान्हा उपाध्याय ६१, हृदान खराडे ३६, कुणाल शर्मा ४/४७, अब्दुल्ला खात्री ४/४८) बोरीवली केंद्र : १०.१ षटकांत २ बाद ५९ (प्रसाद विश्वकर्मा ३७)

२. चर्चगेट केंद्र विरुद्ध कलीना केंद्र
📍 एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब, कलीना
कलीना केंद्र : ४३.२ षटकांत ९० सर्वबाद (श्रेयस खिलारेने ३४ ,जय म्हात्रे (५/२६) चर्चगेट केंद्र :४६ षटकांत ७ बाद १२५ (धैर्य पाटील ३३, शार्दूल फगारे ३१ श्रेयस नाईक ४/१९)

🔹 ग्रुप ब
१. MCA अकॅडमी केंद्र vs घाटकोपर केंद्र
📍 RCF स्पोर्ट्स क्लब, चेंबूर
घाटकोपर केंद्र : ३१.५ षटकांत १०८ सर्वबाद (विकास साराफने ३९, राजवीर लाड ९/२४ ) MCA अकॅडमी केंद्र: ४५ षटकांत ४ बाद १६९ (देवाशीष घोडके नाबाद ९२, श्लोक माळी ३८)

२. माटुंगा केंद्र vs वाशी केंद्र
📍 माटुंगा जिमखाना
वाशी केंद्र: ४९.१ षटकांत २३५ (स्पर्श घोलप ५७, निशाद परब ५१, पुगाझ सुदरराज ४२, सुरज चौहान नाबाद ३०,आर्यन कांबळेनेही ३३,आटीश लाल ४/३२, शौर्य केतन ३/६६) माटुंगा केंद्र

🔹 ग्रुप क
१. डोंबिवली केंद्र vs ठाणे केंद्र
📍 DPCC, माटुंगा
ठाणे केंद्र: ५८.१ षटकांत २२५ (अथर्व गावडे ५५, हर्ष कदम ४३, तन्मय मालुसरे (४१, स्वरूप आंब्रे ४/४९) डोंबिवली केंद्र

२. कल्याण केंद्र vs बदलापूर केंद्र
📍 DPZCC, माटुंगा
बदलापूर केंद्र: २१.२ षटकांत ६४ सर्वबाद (मयंक शर्मा ५/२, दर्शन राठोड ३/२०) . कल्याण केंद्र: ५३ षटकांत ७ बाद २५४ (सार्थ पाटील ११४, रियान तेर्वे ७८,प्रद्न्यान भोसले ४/६७)

🔹 ग्रुप D
१. पालघर केंद्र vs बोईसर केंद्र
📍 टाटा स्टील क्रिकेट ग्राउंड, बोईसर
बोईसर केंद्र: ५९.४ षटकांत १२७ सर्वबाद (विहंग आक्रे ३१, शुभम पिंपळे ४/२०) पालघर केंद्र : २४ षटकांत २ बाद ९०

२. मीरा रोड केंद्र vs विरार केंद्र
📍 यशवंत नगर क्रिकेट ग्राउंड, विरार
मीरा रोड केंद्र : ६४ षटकांत १५८ सर्वबाद (स्वरूप गावई ४२, गोलू पाल ४/३७, प्रवीर सिंग ३/४३) विरार केंद्र :१७ षटकांत १ बाद ६४ धावा ( उमर खोटे नाबाद ४०)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment