शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

रा. फ. नाईक, टागोर नगर मित्र, ज्ञानशक्ती युवा यांची महिलात, तर उत्कर्ष् मंडळ,जय बजरंग वाशिंद यांची पुरुषांत ५-५चढाईच्या डावात विजयी सलामी.

---Advertisement---
  • श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित “७३वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा-२०२६.

ठाणे : १०१ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या श्री मावळी मंडळाच्या “७३व्या राज्यस्तरीय महिला गट कबड्डी स्पर्धेत रा. फ. नाईक, टागोर नगर मित्र, ज्ञानशक्ती युवा यांनी विजयी सलामी दिली. उत्कर्ष मंडळ,जय बजरंग, वाशिंद यांना पहिल्या फेरीत विजय मिळविण्याकरिता ५-५ चढायांचा डाव खेळावा लागला. या स्पर्धेचे उदाघाटन महाराष्ट्र राज्याचे परिवाहन मंत्री नाम. प्रताप सरनाईक यांचे हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व ठाणे जिल्हा कबड्डी असो. च्या मान्यतेने ठाण्यातील मावळी मंडळाच्या चरई येथील भव्य पटांगणार आजपसून सुरु झालेल्या महिलांच्या सामन्यात रा. फ. नाईक संघाने शताब्दी स्पोर्टस् चा प्रतिकार ३४-३० असा मोडून काढला. रेखा चिकणे, भारती शेळके यांच्या चढाई पकडीच्या खेळमुळे रा. फ. नाईकने पूर्वार्धात लोण देत २१-१४ अशी आघाडी घेतली. पण उत्तरार्धात शताब्दीच्या नंदिनी मौर्या, अनघा गायकवाड यांनी आपला खेळ गतिमान करीत लोणची परतफेड करीत सामन्यात चूरस निर्माण केली. पण संघाला विजयी करण्यात त्या अपयशी ठरल्या. उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाने ठाण्याच्या प्रेरणा कलाला २७-२३ असे नमवीत आगेकूच केली. प्रतिक्षा भागवत, सायली फाटक यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. प्रेरणाच्या साधना जाधवने एकाकी लढत दिली.
ठाण्याच्या ज्ञानशक्ती युवाने उपनगरच्या स्वस्तिक मंडळावर ४७-२८ अशी मात केली. विश्रांतीला २लोण देत २९-१४ अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानशक्तीने विश्रांतीनंतर आणखी एक लोण देत आपला विजय सोपा केला. हिमानी गायकवाड, यतिक्षा बागडे, पौर्णिमा देवरे यांच्या झंझावाती खेळाने ज्ञानशक्तीला १९ गुणांच्या फरकाने विजय मिळविता आला. स्वस्तिकच्या दिव्या तिरवडकर, वनिता यादव चमकल्या. पुरुषांच्या लढती मात्र पहिल्या फेरीपासुन चुरशीच्या झाल्या. उपनगरच्या उत्कर्ष मंडळाने ५-५चढायांच्या डावात ठाण्याच्या विजय मंडळाला ४४-४३(६-५) असे चकवीत आगेकूच केली. सुरुवातीपासुन चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात पहिल्या डावात २०-१८ अशी उत्कर्ष कडे आघाडी होती. पण पूर्ण डावात विजयने ३८-३८ अशा बरोबरीत सामना आणला. ५-५चढायात मात्र उत्कर्षने बाजी मारली. शाम, रिकेश उत्कर्ष कडून तर स्मित पाटील, धीरज पाटील विजय कडून उत्कृष्ट खेळले. दुसऱ्या सामन्यात जय बजरंग, वाशिंदने ५-५ चढायात उपनगरच्या मुलुंड स्पोर्टस् चा ३५-३२(८-५) असा पाडाव केला. मध्यंतराला १४-११ अशी जय बजरंगकडे आघाडी होती. पूर्ण डावात मुलुंड स्पोर्टस् ने २७-२७ अशा बरोबरीत सामना आणला. पण ५-५चढायात त्यांना विजयाची किमया साधता आली नाही. त्यात जय बजरंगने ८-५अशी बाजी मारली. पूर्ण डावात दोन्ही संघाना एकही लोण देता आला नाही. आशिष पाटोळे, जालिंदर सानप, अतुल देसले जय बजरंग कडून, तर रोहन राठोड, योगेश गुरव, पुनीत पुजारी मुलुंड स्पोर्टस् कडून उत्कृष्ट खेळले. श्री विठ्ठल मंडळाने श्रीराम कबड्डी संघाला ४३-२७ असे नमविले ते अक्षय मकवाना, कैस्तुभ पवार, सिद्धेश पांचाळ यांच्या चतुरस्त्र खेळामुळे. श्रीराम संघाचे शुभम घागरूम, नीरज सरोज बरे खेळले. उपनगरच्या शूर जवानने चुरशीच्या लढतीत ठाण्याच्या नवरत्न मंडळावर ४५-४३ असा विजय मिळविला. आक्रमक सुरुवात करीत २लोण देत २५-१० अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या शूर जवानला नंतर मात्र नवरत्नने चांगलेच जेरीस आणले. मध्यंतरा नंतर त्या २लोणची परतफेड करीत सामना रंगतदार केला. पण सांगाला विजयी करण्याय ते कमी पडले. नारायण परब, निखिल चव्हाण, हर्षद अंकुषे यांनी शूर जवान कडून तर सुजल जाधव, अद्वैत देसाई यांनी नवरत्न कडून उत्कृष्ट खेळ केला


इतर संक्षिप्त निकाल :- महिला १)जय भारत स्पोर्टस् वि. वि. भारतमाता (४०-१५), २)विवेक स्पोर्टस् वि. वि. शिवकन्या (७६-२६).
पुरुष :-१)नंदकुमार वि. वि. अमरज्योत (३४-२७), २)ओम् साई वि. वि. भाऊ स्पोर्टस् (५८-१४), ३)श्रीराम विश्वस्त वि. वि. अरुण मंडळ (५२-१८).

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment