शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भारतीय नौदलाने “बंड्या मारूती अमृत महोत्सवी” चषक पटकाविला. भरत हुडा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला

---Advertisement---

बंड्या मारूती सेवा मंडळ अमृत महोत्सवी अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धा

मुंबई : भारतीय नौदलाने बंड्या मारूती सेवा मंडळाने आयोजित केलेल्या अखिल भारतीय पुरुष व्यवसायिक कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकविले. नौदलाचा भरत हुडा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रु. एक लाख(₹१०००००) देऊन गौरविण्यात आले. बंड्या मारूती संघाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे सह-प्रायोजक होते लाईफ इन्शुरन्स ऑफ इंडिया(LIC), तर ऑफिशियल पार्टनर होते बँक ऑफ इंडिया. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे मॅट वर झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय नौदलाने यु. पी. योद्धाचा प्रतिकार ४६-२७ असा सहज मोडून काढत रोख रु. पाच लाख(₹५०००००/-) व चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या यु. पी. ला चषक व रोख रु. तीन लाख(₹३०००००/-)वर समाधान मानावे लागले. दोन्ही संघानी सावध सुरुवात केली. त्यामुळे पहिली चार/पाच मिनिटे सावध खेळ केल्यानंतर नौदलाने आपला खेळ गतीमान करीत पहिला लोण देत १६-१० अशी आघाडी घेतली. लोण घेतल्या नंतर योद्धाच्या गगन गौडाने तुफानी चढाई करीत ३ गडी टिपत सामन्यात चूरस निर्माण केली. पण नौदालाने पूर्वार्धात आणखी एक लोण देत आणला. विश्रांतीला २७-१८ अशी आघाडी नौदलाकडे होती. उत्तरार्धात शिलकी गड्याची पकड करीत दुसरा लोण देत आपली आघाडी ३०-१८ अशी केली. त्यानंतर झटपट तिसरा लोण देत ४१-२३ अशी आघाडी वाढविली. येथेच यु. पी. ने आपली हार मान्य केली. यु. पी. ला एकही लोण देता आला नाही. नौदलाच्या या विजयात भरत हुडाने चढाईत १५, तर रोहित तोमरने ११ गुण घेत सर्वोत्तम कामगिरी केली. त्याला नितेशने ४, तर रिंकूने ३ पकडी करीत उत्तम साथ दिली. यु. पी. कडून मनूने चढाईत १०, तर गगन गौडाने ८ गुण घेत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा बचाव अगदीच दुबळा ठरला.
या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय नौदलाने युवा पलटन(इंशोअरकोट प्रा. लि.)चा ५६-४२ असा, तर यु. पी. योद्धाने युनियन बँकेला ४६-२५ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी चषक व रोख रु. एक लाख(₹१०००००/-) देऊन सन्मानित करण्यात आले. यु. पी. योद्धाचे गगन गौडा आणि सचिन यांना स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू ठरले. त्या दोघांना प्रत्येकी रोख रु. पन्नास हजार(₹५००००/-) प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्रातील संघानी आपला ठसा उमठवीला. युनियन बँक, युवा पलटन यांनी तोडीसतोड खेळ केला. पण अनुभव व ताकद कमी पडल्याने त्यांना अपयश पचवावे लागले. त्यात युनियन बँकेचे खेळाडू अगदी नवखे होते. ते सर्व महाराष्ट्राती होते. प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांनी त्यांच्या कडून सर्वोत्तम कामगिरी करून घेतली. युवाच्या संग्राम मांजरेकरचे देखील कौतुक करावे लागेल. पण त्याने महाराष्ट्रातील खेळाडूंनाचा भरणा अधिक करावा.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. चे प्रभारी अध्यक्ष व माजी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील परब, आमदार सचिन अहिर, बंड्या मारूतीचे आधारस्तंभ आमदार सुनील शिंदे आदी मान्यवारांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment