- भारतावर होणार परिणाम?
नवी दिल्ली : आयात शुल्कात भरमसाठ वाढ करुन जागतिक बाजारपेठ हादरवून सोडणारे डोनाल्ड ट्रम्प यांनी आता औषधनिर्माण क्षेत्रावर निर्बंध लादले आहेत. यावेळी ट्रम्प यांनी औषधे आणि धातूंच्या आयातीला लक्ष्य केल आहे. अमेरिकेने देशाबाहेर बनवलेल्या पेटंट औषधांवर १०० टक्क्यांपर्यंत शुल्क लादले आहे. तसेच प्रमुख धातूंवरील नियमही अधिक कडक केले आहेत. पण, ट्रम्प यांच्या नव्या निर्बंधांचा अर्थ काय? याचा भारतावर काय परिणाम होणार? हे जाणून घेऊयात.भारतावर सध्यातरी या निर्बंधांचा मर्यादीत परिणाम दिसून येईल”, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालात म्हटले आहे. भारताकडून अमेरिकेला निर्यात होणारी ९० टक्के औषधे जेनेरिक आहेत. आणि अमेरिकेने जेनेरिक औषधांना टॅरिफमधून सध्यातरी सवलत दिली आहे. २०२५ मध्ये, भारताने अमेरिकेला ९.७ अब्ज डॉलर्स किमतीची औषधे निर्यात केली, जी त्यांच्या २५.८ अब्ज डॉलर्सच्या एकूण जागतिक औषध निर्यातीच्या ३८ टक्के होती. “भारत अमेरिकेला निर्यात करत असलेली औषधे कमी दरातील जेनेरिक औषधं असल्याने त्याचा सध्यातरी मोठा फटका बसणार नाही”, असे GTRIच्या अहवालात म्हटले आहे.दरम्यान, भारतातील काही कंपन्यांना याचा फटका बसू शकतो, असे या विषयातील तज्ज्ञ सांगतात. ब्रँडेड अथवा विशेष औषधं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना शुल्क भरावे लागू शकते. “भारतातून अमेरिकेला निर्यात होणारे पेटंट औषधं बनवणाऱ्या कंपनीला ‘रिशोरिंग’ योजनेसाठी मंजुरी न मिळाल्यास त्यांनाही १०० टक्के शुल्क भरावे लागणार आहे”, असे अधिकाऱ्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले.











