शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या १९ जिम्नॅस्टिक्स खेळाडूंचा उपमुख्यमंत्र्यांकडून सन्मान

---Advertisement---

सुनेत्रा पवार यांनी पुढील भविष्यातील स्पर्धाना व खेळाडूंच्या प्रगतीसाठी मदतीची दिली ग्वाही

मुंबई :- लोकमान्य शिक्षण संस्था संचालित शरद आचार्य क्रीडा केंद्राच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेच्या जिम्नॅस्टिक्स केंद्रात सराव करणाऱ्या १९ खेळाडूंनी गोवा येथे झालेल्या आशियाई ऍक्रोबॅटीक्स जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत १५ पदके पटकावून शाळेचे संस्थेचे , मुंबई, महाराष्ट्र आणि भारताचे नाव उंचावले. या विद्यार्थ्यांना लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव माणिक पाटील, विश्वस्त सुबोध आचार्य, विनायक कुलकर्णी व पदाधिकाऱ्यांनी खेळाडू व प्रशिकांचे मार्गदर्शन केले होते. लोकमान्य शिक्षण संस्था संचालित जवाहर विद्याभवन शाळेतील मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांनी या संदर्भातील माहिती स्थानिक आमदार सना मलिक यांना दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव सना मलिक यांनी सर्व खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करताना उपमुख्यमंत्र्यांची भेट करून देऊ अशी ग्वाही मलिक यांनी दिली होती. त्या नुसार दिनांक १९ मे २०२६ रोजी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यात आली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खेळाडू प्रशिक्षकांना शुभेच्छा देऊन पुढील भविष्यातील स्पर्धाना व खेळाडूंच्या प्रगतीसाठी मदतीची ग्वाही दिली. यावेळी खेळाडू ऋतुजा जगदाळे, रुणल रणपिसे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, अर्ना पाटील, आचल गुरव, वैदही मयेकर, आदित्य दिघे, सान्वी शिंदे, अश्विन गोसावी, नमो युनियल,अथर्व जानस्कर, दीक्षांत ससाणे, हर्ष अग्रवाल, काव्या कुंडे, रेवांत रणपिसे, महादेव गावडे, श्लोक पडवळ, श्लोक ठोंबरे यांच्यासह प्रशिक्षक राहुल ससाणे, योगेश पवार, सुनील रणपिसे ,मंदार म्हात्रे, महेंद्र चेंबूरकर आदी उपस्थित होते. या खेळाडूंमध्ये समाजसेवक जयप्रकाश आग्रवाल यांचे चिरंजीव हर्ष अग्रवाल यांचा ही समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment