नवी दिल्ली : गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसताना दिसून येत आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे जगातील अनेक देशांत ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता आहे. भारतातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता भारतातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १९५.५ रुपयांची, तर कोलकातामध्ये २१८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासूनच (१ एप्रिल) हा बदल लागू करण्यात आला आहे
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १९५ रुपयांची वाढ











