शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

‘भारती पल्स रन’ स्पर्धा उत्साहात संपन्न

---Advertisement---

भारती विद्यापीठ कॅम्पस मॅरेथॉनमध्ये ३०० स्पर्धकांचा सहभाग

पुणे : भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय क्रीडा समितीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘भारती पल्स रन: एवरी बीट काउंट्स’ या कॅम्पस मॅरेथॉनमध्ये ३०० हून अधिक विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. ‘आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये हृदयाच्या प्रत्येक ठोक्याचे महत्त्व’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश समुदायामध्ये व्यायाम व शारीरिक तंदुरुस्ती यांचे महत्व अधोरेखित करणे हा होता. १०, ५ आणि ३ किलोमीटर अंतरामध्ये ही स्पर्धा पार पडली.
१० किमी पुरुष गटात कीलम भव्ये (५६ मिनिटे २० सेकंद) याने प्रथम क्रमांक पटकावला, तर सुधीर (५६ मिनिटे २६ सेकंद) याने दुसरा क्रमांक मिळवला. १० किमी महिला ऋतुजा प्रधान (१ तास ६ मिनिटे) हिने प्रथम आणि रुचिता फाडे (१ तास ९ मिनिटे) हिने द्वितीय स्थान पटकावले. ५ किमी पुरुष सुरज मुंगसे (२० मिनिटे ०६ सेकंद) याने प्रथम, तर तनिष कदम (२१ मिनिटे ३२ सेकंद) याने दुसरा क्रमांक पटकावला.
५ किमी महिला नव्या खन्ना (२७ मिनिटे ०७ सेकंद) हिने प्रथम स्थान, तर वैष्णवी पिसे (२७ मिनिटे ५८ सेकंद) हिने द्वितीय स्थान मिळवले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, उपप्राचार्य डॉ. प्रसाद पोरे, डेप्युटी मेडिकल डायरेक्टर डॉ. जितेंद्र ओसवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. क्रीडा समितीच्या अध्यक्षा डॉ. वसुंधरा लोंढे, इतर सदस्य डॉ. प्रसून मिश्रा, डॉ. अमृतराज पाटील, आदित्य पाटील, तिषा जैन, साक्षी काळे आणि अभिषेक चेके यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment