शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शिवडी महोत्सव संपन्न

---Advertisement---

मुंबई : शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ, सिद्धी संस्कृती फाउंडेशन च्या वतीने नुकतेच १२ दिवस शिवडी महोत्सवाचे आयोजन शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांच्या विशेष सहकार्याने बाल विकास मनोरंजन मैदान शिवडी येथे करण्यात आले होते. या महोत्सवाचा शुभारंभ कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाने शिवसेना विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला होता. यावेळी स्थानिक नगरसेविका सुप्रिया दळवी, विधानसभा प्रमुख लताताई रहाटे, माजी नगरसेविका श्वेता राणे, वैभवी चव्हाण, विधानसभा संघटीका दिव्या घाडीगावकर, शाखाप्रमुख हनुमंत बैजू हिंदोळे, जयसिंग भोसले ,महिला शाखा संघटिका शुभदा पाटील, बालविकास मंडळाचे अध्यक्ष मुकुंद परब, विकास मोरे, खजिनदार महेश पवार हे देखील उपस्थित होते. सलग १२ दिवस चाललेल्या या कार्यक्रमात मुंबई शहर कबड्डी असोसिएशन च्या मान्यतेने ब गट कबड्डी स्पर्धा, एकेरी नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा, महिलांसाठी खेळ खेळू पैठणीचा कार्यक्रम, पाककला स्पर्धा, ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा, विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन देखील करण्यात आले होते. या शिवडी महोत्सवासाठी विभागातील शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांची उपस्थिती लाभली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment