२ मिनिटात तपासणार औषधाची गुणवता; ८ विभागात कार्यान्वित
मुंबई : नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना डॉक्टरांची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा यांच्याइतकेच औषधांचे गुणवत्ता नियंत्रण महत्त्वाचे आहे. नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांमधून गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आठ विभागांत आधुनिक औषध शोध यंत्र (ड्र्ग डिटेक्शन मशीन) कार्यान्वित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला पुरवठा होत असलेली औषधे गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी पहिल्यांदाच ड्र्ग डिटेक्शन यंत्रणा वापरण्यात येत असल्याचे सार्वजनीक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या यंत्रणेच्या माध्यमातून औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी करून संशयित अथवा गुणवत्तेबाबत त्रुटी आढळणारे नमुने पुढील प्रयोगशाळीय पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. औषध खरेदी आणि पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नियमित देखरेख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे श्री. आबिटकर म्हणाले.
आरोग्य भवन येथे आज आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. संजय काटकर, डॉ. सुनील भोकरे उपस्थित होते. यावेळी औषध शोध यंत्राचे प्रात्यक्षिक देण्यात आले. सदर यंत्र भारतीय नोबेल विजेते शास्त्रज्ञ सर. सी. व्ही. रमण यांच्या रमण इफेक्टवर काम करते.
नागरिकांपर्यंत गुणवत्तापूर्ण औषधे पोहोचावीत, या उद्देशाने वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणासह सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध यंत्रणांमार्फत होणाऱ्या औषध खरेदीची सातत्याने तपासणी करण्यात येणार आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतरच तपासणी करण्याऐवजी औषध पुरवठ्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर नियमित आणि अचानक नमुना तपासणीद्वारे देखरेख ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
विभागाच्या वतीने अशा स्वरूपाची औषध शोध यंत्रणा सुरू करण्यात आली असून, राज्यातील आठ विभागांमध्ये यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. एका यंत्राची किंमत १ कोटी २० लक्ष रुपये असून यावर २ मिनिटाअ या यंत्रांच्या वापरासाठी स्वतंत्र आस्थापना आणि मानक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध असलेल्या औषधांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार असून, औषधांच्या गुणवत्तेबाबत तातडीने प्राथमिक निरीक्षण नोंदविणे शक्य होणार





