शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

अश्विनी भिडे यांनी स्वीकारला पालिका आयुक्तपदाचा पदभार

---Advertisement---

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी काल संध्याकाळी पालिका आयुक्तपदाची सूत्र नव्या आणि प्रथमच महिला सनदी अधिकाऱ्यांची पालिका आयुक्तपदी नियुक्त झालेल्या अश्विनी भिडे यांच्याकडे पालिका मुख्यालयात सुपूर्द केला. भूषण गगराणी हे काल आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव असलेल्या अश्विनी भिडे यांची शनिवारीच मुंबई महागरपालिकेच्या आयुक्त पदी नेमणूक केली.
अश्विनी भिडे या पालिका आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांच्याकडे पुढील आदेश होईपर्यंत व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो रेल महामंडळ, मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला आहे.
दरम्यान, अश्विनी भिडे यांची पालिका आयुक्तपदी नेमणूक झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव पदी एम एम आर डी ए चे आयुक्त लोकेश चंद्रा भाप्रसे यांची सरकारने नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे अपर मुख्य सचिव (खनीकर्म) या पदाचा अतिरिक्त पदभार ही सोपविण्यात आला आहे. हे पदही अश्विनी भिडे यांच्याच कडे होते.

अश्विनी भिडे या सन २०२४ पर्यंत म्हणजे एप्रिल मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. ३ वर्षापेक्षा अधिक काळ त्या या पदावर असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यासह आयुक्त असलेल्या इकबालसिंग चहल व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांच्या बदल्या केल्या होत्या. पालिकेत असतानाही मेट्रो कॉर्पोरेशनच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी भिडे यांच्याच कडे होता. बदली नंतर त्या पूर्ण वेळ मेट्रो कॉर्पोरेशन मध्ये रुजू झाल्या होत्या. त्यानंतर वर्षभरापूर्वी त्यांची मुख्यमंत्र्यांच्या अपर मुख्य सचिव म्हणून बदली झाली होती. त्या १९९५ सालच्या बॅच च्या सनदी अधिकारी आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment