शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

बंड्या मारूती सेवा मंडळ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धा

---Advertisement---
  • मंगळवारपासून या कबड्डी महासंग्रामला प्रारंभ होणार.

मुंबई :- बंड्या मारूती सेवा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्ष आणि हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून “अखिल भारतीय पुरुष व्यावसायिक गट” कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. मुंबईतील ना. म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे दि. २८ एप्रिल ते ०२ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भारतातील नामवंत संघानी आपला सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्रातील सात बलाढ्य संघ भारताच्या विविध राज्यातून आलेल्या आठ संघाशी चूरशीची लढत देतील.
मंगळ. दि. २८ एप्रिल रोजी युवा पलटन(इनशोअरकोट प्रा. लिमि.) विरुद्ध मिडलाईन अकॅडमी या सामन्याने या कबड्डीच्या महासंग्रामाला सुरुवात होईल. मॅटच्या एका क्रीडागणावर सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात हे सामने खेळविले जातील. बी. के. फौंडेशन व महर्षी दयानंद स्पोर्टस् क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च २०१० रोजी काळाचौकी येथे अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा झाली होती. त्यानंतर १६ वर्षानी मुंबईत या स्पर्धेचे आयोजन होत आहे. या स्पर्धेत बारा लाख बारा हजार(₹१२१२०००/-) रुपयांची रोख रक्कम बक्षीसा दाखल वाटण्यात येईल.
स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघास रोख रु. पाच लाख(₹५०००००/-) व आकर्षक चषक, तर उपविजेत्या संघास रोख रु. तीन लाख(₹३०००००/-) व आकर्षक चषक प्रदान करण्यात येईल. उपांत्य उपविजयी दोन्ही संघाना प्रत्येकी रोख रु. एक लाख व चषक प्रदान करण्यात येईल. स्पर्धेत सर्वोत्तम ठरणाऱ्या खेळाडूस रोख रु. एक लाख(₹१०००००/-), तर स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीच्या खेळाडूस प्रत्येकी रोख रु. पन्नास हजार(₹५००००/-) देऊन गौरविण्यात येईल. प्रत्येक सामन्यात उत्तम खेळ करणाऱ्या खेळाडूस रोख रु. पाच हजार(₹५०००/-) देऊन सन्मानित करण्यात येईल. ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम नसून कबड्डीच्या परंपरेला, खेळाडूंच्या जिद्दीला आणि मराठमोळ्या अस्मितेला अभिवादान करणारा एक भव्य सोहळा ठरणार आहे. देशभरातील अव्व्ल प्रो-कबड्डी स्टार या संघातून खेळणार असल्याने प्रत्येक सामन्यात थरार, कौशल्य आणि उत्तम रणनीतीचा उत्कृष्ट संगम पहावयास मिळणार आहे.
या स्पर्धेचे उदाघाटन मंगळ. दि. २८ एप्रिल रोजी सायं. ठीक ०५-०० वा. विभागीय आमदार व महाराष्ट्राचे माजी मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येईल. या प्रसंगी कबड्डीप्रेमी आमदार सुनील शिंदे, आमदार सचिनभाऊ अहिरे, आमदार अजय चौधरी, सुधीर साळवी आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी संघांची ५ गटात विभागणी करण्यात आली आहे. ती खालील प्रमाणे.
१) अ गट :- १)युवा पलटन(इनशोअरकोट प्रा. लिमि.), २) ओ. एन. जी. सी., ३)मिडलाईन अकॅडमी.
२) ब गट :- १)भारत पेट्रोलियम, २) दक्षिण मध्य रेल्वे, ३) मुंबई पोस्टल.
३) क गट :- १) भारतीय नौदल, २) मुंबई बंदर, ३) तामील थलाईवास.
४) ड गट :- १) रेड आर्मी, २)युनियन बँक, जयपूर पिंक क्लब.
५) ई गट :- १) तामिळनाडू स्टेट, २) यु. पी. योद्धा, ३)डी. पी. यु. पुणे.
अधिक माहितीकरिता संपर्क जितेश सापते 8082089159. मंगेश घेगडे 9870509673.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment