- अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक टॉप-२
- ईशान किशन फलंदाजांत दुसऱ्या क्रमांकावर
लंडन : आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत भारताचे 4 फलंदाज टॉप-10 मध्ये आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 200 धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या कॉनर एस्टरहुइजनने 64 स्थानांची झेप घेऊन 39वे स्थान पटकावले आहे. अष्टपैलूंच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या दुसऱ्या स्थानावर कायम आहे.
टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा 875 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावरही भारताचा ईशान किशन आहे. टॉप-10 मध्ये भारताचे एकूण 4 फलंदाज समाविष्ट आहेत. यात तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही स्थान मिळवले आहे. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट चौथ्या स्थानावर आहे.
अष्टपैलूंत सिकंदर रझा पहिल्या स्थानावर
ऑलराउंडर रँकिंगमध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा 328 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा हार्दिक पांड्या 299 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. पाकिस्तानचा सॅम अयुब तिसऱ्या आणि नेपाळचा दीपेंद्र सिंग ऐरी चौथ्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीमध्ये रशीद नंबर-1
गोलंदाजांच्या क्रमवारीत अफगाणिस्तानचा राशिद खान 753 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारताचा वरुण चक्रवर्ती दुसऱ्या आणि पाकिस्तानचा अबरार अहमद तिसऱ्या स्थानावर आहे. टॉप-10 मध्ये भारताचा जसप्रीत बुमराह देखील समाविष्ट आहे.








