- ३४ वी LIC कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा २०२६ दुसरी फेरी
मुंबई : मुंबई क्रिकेटची समृद्ध परंपरा जपणाऱ्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आयोजित ३४ व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामने अत्यंत रोमहर्षक झाले. वाशी सेंटरचा मध्यमगती गोलंदाज आरव सेठी याने अफलातून गोलंदाजी करत हॅट्ट्रिकसह सहा बळी घेत घाटकोपर सेंटरचा दुसऱ्या डावात 119 धावांत खुर्दा उडवला आणि त्यांना फॉलोऑन दिला. दादर पारशी येथील रमेश दडकर मैदानावर रविवारी झालेल्या सामन्यात दिवसअखेर वाशी सेंटरने 5 बाद 173 धावा केल्या होत्या.
ठाणे सेंटरने बदलापूर सेंटरवर डाव आणि 172 धावांनी दणदणीत विजय मिळवला. माटुंगा जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात तनय महांसारिया याने 34 धावांत आठ विकेट्स घेत शानदार कामगिरी केली.
डोंबिवली सेंटरने कल्याण सेंटरवर 92 धावांनी विजय मिळवला. डीपीझेड, मातुंगा येथे झालेल्या या सामन्यात कल्याण सेंटरचा संथ डावखुरा फिरकीपटू दर्शन राठोड याने सामन्यात एकूण 11 विकेट्स घेतल्या, मात्र त्याची ही कामगिरी व्यर्थ ठरली.
३४ वी LIC कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा २०२६
दुसरी फेरी – पहिल्या दिवसाअखेरचे थोडक्यात निकाल
सामन्यांच्या तारखा : ९ व १० मे २०२६
ग्रुप अ
१. बोरिवली केंद्र vs कांदिवली केंद्र
एअर इंडिया स्पोर्ट्स क्लब
नाणेफेक : बोरीवली केंद्र
बोरिवली केंद्र : ७१.२ षटकांत २०६ (आर्यन खोत ६१,अर्णव भुजबळने ४/११,श्रेयस नाईक ३/५१) आणि २० षटकांत २ बाद ९२ (लक्ष्मणप्रसाद रायन शेख ४७, अंश सोनावळे ३६) पहिल्या डावावर विजयी कांदिवली केंद्र : ७८ षटकांत २०१ सर्वबाद (अगस्त्य काशिकरने ९७, श्रेयश खिलारेने ६०,लक्ष्मणप्रसाद विश्वकर्माने ४/१०)
सामना अनिर्णित, मात्र बोरीवली केंद्राने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : लक्ष्मणप्रसाद विश्वकर्मा
२. चर्चगेट केंद्र vs कांदिवली केंद्र
SRT जिमखाना
नाणेफेक : चर्चगेट केंद्र
चर्चगेट केंद्र: ८१.३ षटकांत ६ बाद ३५४ डाव घोषित (शार्दुल फगारेने शानदार १५५, आरुष कोल्हेने १०९) आणि ८ षटकात ३३/१) पहिल्या डावावर विजयी कांदिवली केंद्र: ५४.१ षटकांत १७० (संचित गावडेने ८५, अवधूत रावळने ५०, निखिल गुरवने ३/३७, अर्जुन भोसलेने ३/४१)
सामना अनिर्णित, मात्र चर्चगेट केंद्राने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : शार्दुल फगारे
ग्रुप ब
१. MCA अकॅडमी केंद्र vs माटुंगा केंद्र
RCF स्पोर्ट्स क्लब
नाणेफेक : MCA अकॅडमी सेंटर
MCA अकॅडमी केंद्र: ४६.२ षटकात १९५ (अक्षत जोशीने ३३,अमितेश गावंडेने ३१, आदित्य पांडेने ६/६८) आणि ४८.१ षटकांत ८ बाद १८२ डाव घोषित (अर्जुन दादरळार ५३, अक्षत जोशी ५१, देवाशीष घोडके ३१,आदित्य पांडेने पुन्हा ३/७९) पहिल्या डावावर विजयी माटुंगा केंद्र: ४६.३ षटकात ११२ धावांत सर्वबाद (नीव जेठवानीने ४२, राजवीर लाडने ६/५१, अद्वय चौधरीने ४/१०)
सामना अनिर्णित, मात्र MCA अकॅडमी केंद्राने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : आदित्य पांडे
२. घाटकोपर केंद्र vs वाशी केंद्र
DPCC, माटुंगा
वाशी केंद्र: ८१.४ षटकांत २२६ (समीक्ष नायरने ६०, वेदांग मिश्रा ४४, ईशान यादवने ३५,अद्वित तिवारीने ३/४८) घाटकोपर केंद्र: ३६ षटकांत ११९ धावांत सर्वबाद (आरव सेठीने हॅट्ट्रिकसह ६/२९) आणि ३५ षटकांत ५ बाद १७३ (शिवम सिंगने ६९ ,निशाद परबने ४/४१)
सामना अनिर्णित, मात्र वाशी केंद्राने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : आरव सेठी
ग्रुप क
१. डोंबिवली केंद्र vs कल्याण केंद्र
DPZCC, माटुंगा
नाणेफेक : कल्याण सेंटर
डोंबिवली केंद्र: ३८.२ षटकात १२० (रैयान खान ३४, स्मित पोमेंडकर ३२, दर्शन राठोडने ५/३४ ).आणि ३९.२ षटकात १६५ (अक्षांश सिंगने ५९) विजयी विरुद्ध कल्याण केंद्र: २३.४ षटकात १०५ आणि २५.४ षटकात८९ (सार्थ पाटीलने ३१, स्वरूप आंब्रेने ५/११)
डोंबिवली केंद्राचा ९२ धावांनी विजय
सामनावीर : अक्षांश सिंग
२. ठाणे केंद्र vs बदलापूर केंद्र
माटुंगा जिमखाना
बदलापूर केंद्र: ३५.१ षटकात ११६ (प्रज्ञान भोसले ३२, तन्मय महन्सारियाने ४/३४, सर्वेश भोईरने ३/६) आणि १९.३ षटकात ५५ (तन्मय महन्सारियाने ४/०) पराभूत विरुद्ध ठाणे केंद्र: ७१.४ षटकांत ३४३ (नीव जेठवानी ९८, अथर्व गावडे ६२, आर्यन पवार ४७,पार्थ राणे ३८)
ठाणे सेंटरचा डाव आणि १७२ धावांनी विजय
सामनावीर : तनय महन्सारिया
ग्रुप ड
१. पालघर केंद्र vs विरार केंद्र
ST कदम क्रिकेट अकॅडमी, पालघर
विरार केंद्र: ८१ षटकांत ७ बाद २६४ (ओंकार नाईक ९८, उमर खुटेने ४९, तर गोलू पाल नाबाद ४४) पालघर केंद्र:३९.२ षटकात १२१ धावांत सर्वबाद (अर्हान पटेलने ४७, प्रवीर सिंगने ५/३३,गोलू पालने ४/३३) आणि ३३ षटकांत ८ बाद १०० (गोलू पालने पुन्हा ५/३३)
सामना अनिर्णित, मात्र विरार सेंटरने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : गोलू पाल
२. बोईसर केंद्र vs मीरा रोड केंद्र
साईनाथ स्पोर्टिंग क्लब, विरार
मीरा रोड केंद्र: ४१.३ षटकात १२१ धावांत (हृदान मिश्रा ३३, श्लोक चौधरीने ५/२१) आणि ४८ षटकांत ८ बाद १८७ (स्मित केरकर नाबाद ५९ ,अनय वाडेकरने ४०) बोईसर केंद्र: ५८.२ षटकात २१८ (विहंग आक्रे ५१, आश्मिक पाटील ४९, अमीर शेख ३३, स्मित केरकरने ५/५९, अहिल अली सय्यदने ४/४६)
सामना अनिर्णित, मात्र बोईसर सेंटरने पहिल्या डावात आघाडी घेतली.
सामनावीर : स्मित केरकर








