शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

श्रीरामपूर येथे पत्रकार भवन परिसरात वृक्षारोपण संपन्न

---Advertisement---

श्रीरामपूर नगरपरिषद, प्रेस क्लब, वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम

श्रीरामपूर : झाडे लावणे सोपे असते, पण त्याची व्यवस्थित निगा राखणे, हे काम अवघड असते. श्रीरामपूरातील वसुंधरा वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करत असतात. श्रीरामपूर नगर परिषद, प्रेस क्लब (श्रीरामपूर) व वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीच्या वतीने पत्रकार भवन परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

वृक्षारोपण कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाने, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, मनोज आगे, नगर पालिकेचे अभियंता ॲड प्रमोद चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप आहेर, राजेंद्र बोरसे, मधुकर माळवे, स्वामीराज कुलथे, बद्री वढणे, राजेंद्र दळवी, संतोष डगले, वृक्ष संवर्धन समितीच्या अध्यक्ष साधन चुडीवाल, संस्थापक निता डंबीर, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, चित्रा खटोड, नयना चौधरी, सविता अग्रवाल, सुनिता चुडीवाल, रेखा पाटणी, शुभांगी दळवी, साधन चुडीवाल आदी उपस्थित होते.

या उपक्रमाला मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी शुभेच्छा दिल्या असून श्रीरामपूर शहरात वृक्षारोपण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, प्रत्येक नागरिकांनी आपापल्या घरासमोर किमान एक तरी झाड लावावे, असे आवाहन त्यांनी केले.

वसुंधरा वृक्षसंवर्धन समितीचे संस्थापक नीता
डंबीर यांनी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. नागरिकांनी आपापल्या परिसरात सामाजिक संघटनाला बरोबर घेऊन वृक्षारोपण केले पाहिजे, ही काळाची गरज आहे,

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment