शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जि.प. प्राथमिक शाळा, मुले शाळेत प्रवेशोत्सव व चौथी निरोप समारंभ उत्साहात संपन्न

---Advertisement---

नेवासा : जि.प. प्राथमिक शाळा, नेवासा मुले येथे दिनांक 24 एप्रिल 2026, शनिवार रोजी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.
प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला डोक्यावर राजमुकूट, फुगे, गुलाबाचे फूल आणि चॉकलेट देऊन विशेष स्वागत करण्यात आले. तसेच सेल्फी पॉइंट, हस्तछाप (हाताचे ठसे) उपक्रम आणि भोजनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी हा दिवस संस्मरणीय केला.
याच कार्यक्रमात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तिसरीतील मुसेब पठाण आणि हारीस तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले, तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शाळेतून मिळालेल्या संस्कारांची आणि ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर जपण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी वर्गासाठी भेटवस्तू देऊन शाळेबद्दलचा ऋणानुबंधही जपला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्राजक्ता कडू यांनी भूषविले, तर उपाध्यक्ष स्वप्नील मगर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केंद्रप्रमुख काशीद, मुख्याध्यापक आसिफ शेख, पाखरे सर, वडघणे सर, तसेच नेवासा सार्वमतचे संपादक रमेश शिंदे पवार, पालक विलास डुकरे, सागर सोनटक्के, संदीप सरगैये यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका सुनिता कर्जुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मिनाक्षी लोळगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कामिनी बायस, संध्या लोंढे, साईनाथ वडते, आण्णासाहेब शिंदे, विद्या खामकर, अश्विनी मोरे, ज्योती गाडेकर, अर्चना बोकारे आणि प्रतिभा गाडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप स्वादिष्ट भोजनाने करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment