सोनई : मुळा एज्युकेशन संस्थेच्या यश अकॅडेमी विद्यालयाने सीबीएसई दहावी परीक्षेच्या निकालात शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत तालुक्याच्या निकालात कौतुकास्पद यश प्राप्त केले आहे. विद्यालयातील तनिष्का वसंत डाके हिने ९७.४टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.विद्यालयात डाके हिने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संस्थेचे सचिव उत्तमराव लोंढे, सहसचिव डाॅ.विनायक देशमुख यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. अमेय महेश लेंबे (९६.८) जान्हवी महेश खंडागळे( ९६.४) जान्हवी विलास घावटे( ९६.००) गौरी रामदास दरंदले( ९५.००) वेदांत दत्तात्रेय जायगुडे ( ९२.२) व सिध्दार्थ योगीनाथ गाडेकर ( ९०.४) यांचा गुणवत्ता यादीत समावेश झाला आहे.’मुळा’ चे संस्थापक यशवंतराव गडाख, मार्गदर्शक माजी मंत्री शंकरराव गडाख, उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक केले. प्राचार्य शैलेश दरेकर, सुपरवायझर असिफ शेख व शिक्षकवृंदाचे गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. ——————————–
यश अकॅडेमीतील विद्यार्थ्यांचे सीबीएसई परिक्षेत घवघवीत यश







