शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

जागतिक आरोग्य दिन उत्साहात साजरा – मेडिकव्हर हॉस्पिटल

---Advertisement---

संगमनेर : संगमनेरसात एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मेडिकव्हर हॉस्पिटल, संगमनेर येथे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमादरम्यान आरोग्याविषयी जनजागृती, निरोगी जीवनशैलीचे महत्त्व आणि नियमित आरोग्य तपासणीची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सेंटर हेड डॉ. स्नेहल गायके यांनी उपस्थितांना मौल्यवान मार्गदर्शन करत “निरोगी समाज हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे” असे सांगत सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.तसेच येत्या १९ एप्रिल रोजी होणाऱ्या वर्ल्ड लिव्हर डेच्या पार्श्वभूमीवर डॉ. सागर हासे नेफ्रॉलॉजिस्ट यांच्या हस्ते विशेष लिव्हर स्क्रीनिंग पॅकेज आजपासून सुरू करण्यात आले.या पॅकेजमध्ये खालील तपासण्यांचा समावेश आहे:• Liver Function Test (LFT)• Uric Acid• Fasting Blood Sugar (FBS)• HBsAg (Hepatitis B Screening)• Ultrasound Sonography (Abdomen)• Lipid Profile• Hepatitis B Vaccine (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार)• Liver Specialist Consultationया संपूर्ण पॅकेजची विशेष किंमत फक्त ₹2000/- ठेवण्यात आली आहे.यावेळी डॉ. स्नेहल गायके यांनी Preventive Health Checkup (प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी)चे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी वेळोवेळी तपासणी करून आपले आरोग्य जपावे, असे आवाहन केले.मेडिकव्हर हॉस्पिटलतर्फे रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच संगमनेर तालुक्यातील नागरिकांनी या विशेष पॅकेजचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व डॉक्टर, कर्मचारी व व्यवस्थापन यांचे विशेष योगदान राहिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment