शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

घोडेगावात मुळा पाटबंधारे विभागातर्फे महिला शेतकरी मेळावा उत्साहात

---Advertisement---

सोनई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या संकल्पनेतून अहिल्यादेवी होळकर त्रिशतकोत्तर शताब्दीनिमित्त जलव्यवस्थापन पंधरवाडा कार्यक्रम हाती घेण्यात आला. घोडेगाव येथे झालेल्या जागतिक महिला शेतकरी मेळाव्यात पंचक्रोशीतील महिला, पाणी वापर संस्थेचे सदस्य व मुळा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिवव्याख्याते हसन सय्यद, शाखाधिकारी मनिषा शिरगिरे व पसायदान-आनंदवन सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार विनायक दरंदले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. शिवव्याख्याते सय्यद यांनी आपल्या भाषणात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती देताना त्यांचे संस्कार म्हणून छत्रपती घडल्याचे सांगताना स्वराज्य मिळण्यामागे आईच्या प्रेरणादायक प्रबोधनाचा व संस्काराचा मोठा हात असल्याचे सांगितले. जलसंपदा विभागाच्या जलव्यवस्थापन कृती पंधरवडय़ात प्रत्येकानी संकल्पाचा ध्यास घेऊन कार्य करणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाकडून सुरु असलेल्या कृती पंधरवडा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखाधिकारी मनिषा शिरगिरे होत्या. उपविभागीय अभियंता संदीप शेळके, स्वप्नील देशमुख, अभिषेक पवार, माधवबाबा पाणी वापर संस्थेच्या अध्यक्षा अनीता सुनिल दरंदले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
घोडेगाव मुळा पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता संदीप पवार यांनी प्रास्ताविक भाषणात कृती पंधरवडय़ात आयोजित केलेल्या उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी पाण्याचे महत्त्व सांगताना पाणी बचतीची सुरुवात स्वतःपासून करावी असे आवाहन केले. शेती, उद्योग,व्यवसाय व पशुपालन मध्ये प्रत्यक्ष महिलांचा सहभाग असेल तर त्यामध्ये निश्चित वृध्दी असल्याचे सांगण्यात आले. रोहिणी जाधव व अनुपमा काळे यांनी सुत्रसंचालन केले. वर्षा दहिफळे यांनी आभार मानले.


Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment