संगमनेर : प्रतिनिधी हिंदू धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या संत-महंतांविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याच्या निषेधार्थ वारकरी क्रांती सेना, ज्ञानराज माऊली वारकरी गुरुकुल संस्था आश्वी, वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघाच्या वतीने संगमनेर येथे निषेध व्यक्त करण्यात आला आहे. तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रांत अधिकार्यांकडे निवेदना द्वारे केली आहे. याबाबत संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी हिंदू धर्मीयांच्या श्रद्धास्थान असलेल्या वारकरी संप्रदायातील संत-महंतां विषयी अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध होत आहे . या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे., अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यात सामाजिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लवांडे या व्यक्तीवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रांती सेना, वारकरी संस्थेच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणीताई राऊत सुनील महाराज पवार वेणूनाथ महाराज विखे लक्ष्मण महाराज पानसरे खेमनर महाराज नान्नर महाराज ज्ञानदेव महाराज पानसरे पोपट महाराज आगलावे वाघमोडे महाराज शेळके महाराज सातपुते महाराज ज्योतीताई पवार महाराज तसेच शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी नगरसेविका साक्षी सूर्यवंशी शशांक नामन श्याम नाईकवाडी मुकेश मुर्तडक यांच्यासह वारकरी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
संत-महंतांविषयी अपमानास्पद वक्तव्याचा वारकरी संप्रदायकडून निषेध; वैदिक हिंदू वारकरी आणि क्रांती सेना वारकरी संस्थेकडून कारवाईची मागणी







