शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

संत ज्ञानेश्वर मंदीरात गुरुवारपासून वारकरी बालसंस्कार शिबीर

---Advertisement---

सोनई : नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज पैसखांब मंदीरात गुरुवार (ता.७) पासून उन्हाळी शालेय सुट्ट्यांनिमित्त पंधरा दिवसीय वारकरी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी दिली.बालसंस्कार शिबीरात सहभागी विद्यार्थ्यांना काकडा भजन, योग, प्राणायाम, ज्ञानेश्वरी पाठांतर, हरिपाठ, अभंग, थोर संतांचे चरित्र, संस्कृत श्लोक घेण्यात येणार आहेत. पंधरा दिवसीय शिबीरात भगवान महाराज जंगले, गहिनीनाथ महाराज आढाव, नंदकिशोर महाराज खरात, राम महाराज खरवंडीकर, कृष्णा महाराज हारदे यांच्यासह वीस महाराज मार्गदर्शन करणार आहेत. शिबीरात दहा ते सोळा वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभाग घेता येणार असून येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था मोफत ठेवली आहे. हार्मोनियम व मृदंग वादनाचे धडे देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शक येणार आहेत. सहभाग घेणा-या विद्यार्थ्यानी संत ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त ज्ञानदेव माऊली शिंदे यांच्याकडे नाव नोंदणी करावी असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग अभंग व विश्वस्तांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment