शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दोन यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया; नात्यातील जिव्हाळा आणि त्यागातून दोघांना मिळाले नवजीवन

---Advertisement---


लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नुकत्याच दोन किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या. या दोन्ही शस्त्रक्रियांमध्ये नात्यातील जिव्हाळा, त्याग आणि माणुसकीचे मूर्तिमंत दर्शन घडले आहे. एका भावाने आपल्या मोठ्या भावाला, तर वडिलांनी आपल्या मुलाला किडनीदान करून नवजीवन दिले. या चारही रुग्णांची प्रकृती आता समाधानकारक असून, त्यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या यशामुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. या दोन्ही शस्त्रक्रियांसाठी रूग्णांना कोणताही खर्च करावा लागला नाही. शस्त्रक्रिया व सर्व सुविधा रूग्णालयामार्फत विनामुल्य पुरवीण्यात आल्या आहेत.
पहिल्या किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील गणेश अंकुश घुले (वय ३०) यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. त्यांचे धाकटे भाऊ संतोष अंकुश घुले यांनी आपल्या मोठ्या भावाच्या आरोग्यासाठी स्वखुशीने किडनीदान करण्याचा निर्णय घेतला. भावाच्या नवजीवनासाठी केलेला हा त्याग अत्यंत भावनिक व प्रेरणादायी ठरला आहे.
दुसऱ्या शस्त्रक्रियेत भिंगार येथील रहिवासी मोहम्मद अख्तर (वय ४८) यांनी आपल्या २२ वर्षीय मुलगा मोहम्मद अफजल याला किडनीदान केले. मुलाला जीवनदान देण्यासाठी वडिलांनी घेतलेला हा निर्णय पालकांच्या निस्सीम प्रेमाचे आणि त्यागाचे प्रतीक मानले जात आहे.
प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालयात जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब व गरजू रुग्णांना आरोग्याच्या उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी डॉ. राजेंद्र विखे पाटील हे सातत्याने आग्रही असतात. त्यांच्या याच प्रयत्नांमुळे आज केवळ अहिल्यानगरच नव्हे, तर मराठवाड्यासह राज्यातील सुमारे सहा ते सात जिल्ह्यांतील गरजू रुग्णांना या रुग्णालयामुळे जीवनदान मिळत आहे. या किडनी प्रत्यारोपणाच्या यशस्वी टप्प्यामुळे समाजात अवयवदानाचे महत्त्व अधिक ठळकपणे पोहोचण्यास मदत होत आहे.
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील किडनी प्रत्यारोपणाच्या माध्यमातून रुग्णांना नवजीवन मिळत असून, अवयवदानाचे महत्त्वही समाजापर्यंत पोहोचत आहे. या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेमध्ये रुग्णालय प्रशासनाचे अधिष्ठाता डॉ. सतीश महाजन, रूग्णालय प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे, डॉ.एन.एस.पवार, डॉ.जोर्वेकर, डॉ.तुषार भवर, डॉ. एस. एल. तुंगीकर, डॉ. काजल दरंदले यांचा सहभाग होता.अवयव प्रत्यारोपण समन्वयक ज्ञानेश्वर गाडेकर यांनी रूग्णाचे नातेवाईक, प्रशासन, संपूर्ण डॉक्टर्सच्या टीमच्या परिश्रमामुळे हे शक्य झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

संबंधित बातम्या

Leave a Comment