श्रीरामपुर – हरी योगा फिटनेस क्लब, श्रीरामपूर आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त महिला सक्षमीकरण उद्देशाने भारत माता की जय या नाटिकेच्या माध्यमातून देवीची बारा रूपे सादर करण्यात आली.
निशा सरोदे, सोनाली त्र्यंबक,पूजा राय,नीता धुमाळ,कुंदा थोरात,प्रणिती आढाव,कविता पिंगळे,योगिता रंधावने,पायल खांडगौरे,प्रियंका दहिवाले,आराध्या खांडगौरे आदींनी पार्वती,गंगा, चंद्रघंटा,अन्नपूर्णा, कात्यायनी, सिद्धी दात्री,ब्रह्मचारिणी,वैभव लक्ष्मी,दुर्गालक्ष्मी,कालिका आदी देवीची बारा रूपे साकारले होते.निशा सरोदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या नाटिकेचे संहिता लेखन डॉ योगिता रांधवणे यांनी तर वेशभूषा सुनील भावसार यांनी केली होती.
नवरात्र उत्सवानिमित्त साकारले देवीची बारा रूपे





