शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

सुरेशनगर येथे  त्रिदिनात्मक अखंड हरिनाम सप्ताहास धर्म ध्वजारोहणाने प्रारंभ

---Advertisement---

नेवासा : नेवासा तालुक्यातील आदर्शगाव सुरेशनगर येथील हनुमान मंदिरामध्ये हनुमान जयंती निमित्त त्रिदिनात्मक अखंड हरीनाम सप्ताह व  ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयास संत महंतांच्या हस्ते धर्म ध्वजारोहण करून  मंगळवार दि.३१ मार्च पासून प्रारंभ झाला.
यावेळी झालेल्या धर्म ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानचे महंत स्वामी श्री रमेशानंदगिरीजी महाराज,मध्यमेश्वर देवस्थानचे महंत बालयोगी श्री ऋषिनाथजी महाराज,शिनाई देवस्थानचे उत्तराधिकारी श्री आवेराज महाराज,संतसेवक हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे,हभप विष्णूदास महाराज सांगळे,पारायण व्यासपीठ प्रमुख हभप नितीन महाराज हारकळ,सरपंच सौ.शैलाताई उभेदळ व कल्याणराव उभेदळ,बन्सीभाऊ आगळे यांच्या हस्ते धर्म ध्वजाचे पूजन करण्यात येऊन ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी झालेल्या धर्म ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी आलेल्या सर्व संत मंडळीसह मान्यवरांचे कल्याणराव उभेदळ यांनी स्वागत केले.माजी उपसरपंच विठ्ठलराव पाषाण यांनी प्रास्ताविक केले.उपस्थित संत महंतांचे संतपूजन व उपस्थित मान्यवर मंडळी अन्नदान करणाऱ्या दात्यांचा सोहळा कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव,उद्योजक करमचंद पटेल, जेऊर येथील अशोकराव नवले,भाकचंद पाडळे,जिजाबा उभेदळ,शिवाजी वाळके,मोहन सावंत, भीमा चव्हाण, बबनराव शेटे,बाळासाहेब उभेदळ,खंडू निकाळजे, भाऊसाहेब भोसले,भगवान दळवी,अशोक खंडागळे,हर्षद पाटील,प्रकाश नवले,राजमुद्रा तरुण मंडळाच्या सदस्यांसह  महिला व पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रिदिनात्मक सोहळयामध्ये पहाटे ५ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायाचे पारायण,सायंकाळी ५ ते ६ सामूहिक हरिपाठ, रात्री ७ ते ९ किर्तन असे कार्यक्रम होणार आहे. त्रिदिनात्मक सोहळयात होणाऱ्या पारायणाचा व किर्तन श्रवणाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोहळा कमिटी व राजमुद्रा तरुण मंडळ व  सुरेशनगर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment