शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

प्राचीनतम जैन धर्माचे सिद्धांत विश्वशांतीसाठी अत्यंत प्रभावी – मा. ना. ललित गांधी

---Advertisement---

पुणे : वैशाख सुदी ग्यारस या पावन निमित्ताने जिनशासन स्थापना दिनानिमित्त महावीर प्रतिष्ठान, पुणे येथे अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाच्या वतीने श्रद्धा, भक्ती आणि उत्साहपूर्ण वातावरणात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र जैन विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री मा. ना. ललित गांधी उपस्थित होते. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी सांगितले की, प्राचीनतम जैन धर्मातील अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकांतवाद यांसारखे सार्वत्रिक सिद्धांत आजच्या जागतिक परिस्थितीत विश्वशांती, सहअस्तित्व आणि मानवकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक आहेत.
तसेच त्यांनी पुढे नमूद केले की, भगवान महावीर स्वामी यांनी स्थापन केलेल्या “चतुर्विध संघ” (साधू, साध्वी, श्रावक, श्राविका) या परंपरेतून आजही समाजाला संयम, करुणा, सहिष्णुता आणि नैतिक जीवनाचा संदेश मिळत आहे, जो काळाची गरज आहे.
कार्यक्रमाची सुरुवात जैन ध्वजारोहणाने झाली. मा. ना. ललित गांधी व विजयकांत कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी बाळासाहेब धोका, प्रवीण चोरबेले, नगरसेविका मनीषा चोरबेले तसेच इतर मान्यवरांनी जैन ध्वजास वंदन करून जिनशासनाच्या मूल्यांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली.
अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की, जिनशासन स्थापना दिनाबाबत समाजात काही गैरसमज आहेत. त्यांनी सांगितले की हा दिवस जैन धर्माच्या स्थापनेचा नसून, जिनशासनाच्या स्थापनेचा आहे. जैन धर्म हा अनादिकालापासून चालत आलेला स्वतंत्र व प्राचीन धर्म आहे. याच दिवशी भगवान महावीर स्वामी यांनी चतुर्विध संघाची स्थापना करून धर्माला संघटित स्वरूप दिले, जे समाजाला दिशा देणारे आहे.
या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष महेंद्र सुंदेचा मुथा, अभिजीत शाह, विनोद सोलंकी, मयूर सरनोत, विपेश सोनिगरा, अमित जैन, मनीष जैन, सागर लुनिया, चंद्रकांत दर्डा, राजेंद्र सुराणा, विक्रम ओसवाल, दिनेश शर्मा, हेमलता भंडारी, कस्तुरी पाटील, रसिला जैन, जयश्री पारख यांसह अनेक मान्यवर व धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक मंगलभावना व विश्वशांतीच्या प्रार्थनेने करण्यात आला. सूत्रसंचालन संदीप भंडारी ने तर आभार प्रदर्शन महेंद्र सुंदेचा मुथा यांनी केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment