नेवासा : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र हंडीनिमगाव येथे प्रसिद्ध असलेल्या श्री जालिंदर नाथांच्या यात्रेनिमित्त सकाळीच कावडीने आणलेल्या पाण्याने जालिंदरनाथांच्या मूर्तीस जलाभिषेक घालण्यात आला.यावेळी त्रिवेणीश्वर महादेव मंदिरापासून कावडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत स्वामी श्री रमेशानंदगिरीजी महाराज, मध्यमेश्वर येथील महंत बालयोगी महंत ऋषिनाथजी महाराज,शिनाई देवस्थानचे महंत श्री आवेराज महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मंदिर सभामंडपामध्ये झालेल्या कार्यक्रम प्रसंगी महंत श्री रमेशानंदगिरीजी म्हणाले की धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या हंडीनिमगाव मध्ये जालिंदरनाथांच्या यात्रेचा उत्साह मोठ्या थाटामाटात होत असतो.यामध्ये सर्वधर्मीय समाजातील कुटुंब एकत्र येऊन हा सोहळा शांततेत पार पाडतात.जालिंदरनाथांच्या कृपेने गावातील शांतता,समन्वय असून सर्वजण एकत्र येऊन सन्मानाने राहत असतात,असेच कार्यक्रम यापुढेही सुरू ठेवा अशी अपेक्षा व्यक्त त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी हंडीनिमगावचे सरपंच भिवाजीराव आघाव, सुरेशनगरचे सरपंच कल्याणराव उभेदळ,पांडुरंग उभेदळ, बाळासाहेब साळुंके,माजी सरपंच अण्णासाहेब जावळे,युवा नेते किरण जाधव,अमृत उभेदळ यांनी मनोगत व्यक्त करत यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
यात्रा सोहळयाच्या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले यात्रा सोहळा यशस्वी होण्यासाठी यात्रा कमिटीचे सदस्य मनोहर जाधव,विठ्ठल पिटेकर,विजय धनाळे,रघुनाथ पिटेकर, नवनाथ पिटेकर, पांडुरंग पिटेकर,मच्छिंद्र पिटेकर,सोनू पिटेकर,विजय धनाळे,सोपान गुंजाळ,गोरख गुंजाळ, संजय पिटेकर,दत्तू पिटेकर,बाळू आळकुटे,दत्ता आळकुटे,
महेश धनाळे,सतीश धनवटे आदी सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.सायंकाळच्या सुमारास काढण्यात आलेल्या पालखी मिरवणूकीचे ,फटाक्यांची आतषबाजी करत उत्स्फूर्त स्वागत भाविकांच्या वतीने करण्यात आले.
हंडिनिमगाव येथील जालिंदरनाथांच्या यात्रा उत्सवाला संत महंतांच्या हस्ते ध्वजारोहणाने प्रारंभ







