माळवाडगांव : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे धर्मध्वज चतुर्थ वर्धापन दिन निमित्ताने पंचदिवशीय किर्तन महोत्सव सोहळ्यास स्वामी अरूणनाथगिरी महाराज श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान यांच्या हस्ते दिपप्रज्वलन होऊन मोठ्या भक्तिमय वातावरणात कविराज महाराज झावरे यांच्या किर्तनाने उत्साहात प्रारंभ झाला., माळवाडगांवचे ग्रामदैवत भवानी देवी मंदिर प्रांगणात ग्रामस्थांनी ७५ फुट उंचीचा चार वर्षांपूर्वी भव्य धर्मध्वज बसविण्यात आलेला आहे.दरवर्षी या धर्मध्वजाचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने पंचदिवशीय किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गुरूवर्य भास्कर गिरी महाराज,महंत रामगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षीही दि.१७ एप्रिल ते २१ एप्रिल पर्यंत पंचदिवशीय किर्तन महोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शुक्रवार दि.१७ सायंकाळी ६ वाजता स्वामी अरूणनाथगिरी महाराज श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान, कविराज महाराज झावरे पारनेर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन स़ंपन्न झाले . या दिपप्रज्वलन सोहळ्यास गांवचे माजी लोकनियुक्त सरपंच भाजपा तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक गिरिधर आसने, भाजपा तालुका सरचिटणीस डॉ शंकर मुठे, अशोकचे माजी संचालक बबनराव मुठे,, सारंगधर आसने, नानासाहेब आसने, सुदामराव आसने, आदी उपस्थित होते. या दिपप्रज्वलन सोहळ्यानंतर कविराज महाराज झावरे यांच्या सुश्राव्य किर्तनास सायंकाळच्या वातावरणात प्रारंभ झाला. आज शनिवार दि. १८ रोजी युवा किर्तनकार ज्योतीताई धनाडे जालना, यांचे किर्तन होणार आहे.
माळवाडगांव येथील पंचदिवशीय किर्तन महोत्सव सोहळा अरूणनाथगिरी महाराज यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने प्रारंभ







