शहर देश विदेश संपादकीय राजकारण मनोरंजन क्रीडा भविष्य फोटो अन्य

भय इथले संपेना दुसरा बिबट्या जेरबंद आणखी दोन बिबट्यांची पिंजऱ्या भोवती चक्कर

---Advertisement---


राहुरी : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथे दावीद फकिरा पलघडमल यांच्या शेतात बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले. गेल्या महिन्यापासून पलघडमल/ साबळे वस्तीवर तीन बिबट्यांनी मुक्काम ठोकला आहे त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते एक बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर पिंजरा लावण्यात आला होता आणि दोन दिवसाच्या अंतराने दुसरा एक वर्ष वयाचे मादी बिबट्या जेरबंद झाले.
एक एप्रिल रोजी पुन्हा दावीद फकिरा पलघडमल यांच्या गट नंबर २९०/२ मध्ये पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या. शनिवार दिनांक ४ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता कोंबड्यांच्या सावजाला आकर्षून बिबट्याचे एक वर्ष वयाचे मादी पिल्लू अलगत जेरबंद झाले.
सकाळी बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच त्यांनी सी.सी.टीवी फुटेज चेक केले असता दोन बिबटे पिंजऱ्याच्या कडेने फिरताना दिसून आले. प्रविण पलघडमल यांनी वनविभाग राहुरी व प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
माहिती मिळताच सकाळी वनपाल एस. आर. कोरके, वनरक्षक घुगे, बी.आर.दिवे, एस. आर. झंझट, ड्रायव्हर तारु,प्राणीमित्र विकास म्हस्के घटनास्थळी पोहोचले. व सदर घटनेची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर सालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी गणेश मिसाळ, राहुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल साळुंखे यांना देण्यात आली.
जेरबंद बिबट्याला दुसऱ्या पिंजऱ्यात शिफ्ट करून पिंजरा हलवण्याची कार्यवाही केली. आणि पिंजरा परत त्याच ठिकाणी लावण्यात आला.
यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती व यावेळी प्रविण पलघडमल, सचिन पलघडमल , प्रभाकर पलघडमल , राजु साबळे, आरुष पडघडमल, मयूर पडघडमल, सतीश बर्डे, सोमनाथ बर्डे, विशाल गोधाडे यांनी मदत केली.
वनविभागाने परत पिंजरा लावल्याबद्दल परिसरातील नागरिकांची समाधान व्यक्त केले व वनविभागाचे आभार मानले.
काही महिन्यापूर्वी पत्रकार अनिल वाकचौरे यांच्या मोटार सायकल वर बिबट्याने हल्ला केला होता आणि या हल्ल्यातून ते बालंबाल बचावले होते. आणि त्याच परिसरात दोन बिबटे जेरबंद झाल्यानंतर अजुन दोन बिबटे आढळून आल्याने पुन्हा पिंजरा लावण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment